व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही (Veg Manchurian With Gravy Recipe In Marathi)

#CHR
खूप दिवसांनी रेसिपी शेअर करायचा योग आला. चाईनिस रेसिपीज बनवायला मला नेहमीच आवडते. त्यातल्या त्यात व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ. बघूया मग रेसिपी.....
व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही (Veg Manchurian With Gravy Recipe In Marathi)
#CHR
खूप दिवसांनी रेसिपी शेअर करायचा योग आला. चाईनिस रेसिपीज बनवायला मला नेहमीच आवडते. त्यातल्या त्यात व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ. बघूया मग रेसिपी.....
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेली पत्ताकोबी, कांदा आणि शिमला मिरची घ्यावे.
- 2
आता त्यात पातीचे कांदे, आले-लसूणपेस्ट आणि सोया सॉस टाकावे.
- 3
आता त्यात कॉर्न फ्लोअर, मैदा टाकावे.
- 4
त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी (पाणी जास्त ऍड करू नये) घालून सर्वमिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
- 5
तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे-छोटे बॉल्स बनवून घ्यावे. एका कढईत तळण्यापुरते तेल घालून तेल तापल्यावर बॉल्स मध्यम आचेवर गोल्डन- ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत.
- 6
आपले मंचुरीअन बॉल्स तयार आहे. आता हे तळून बाजूला ठेवावे.
- 7
आता आपण ग्रेव्ही बनवूया, त्यासाठी एका कढईत 2-3 टेस्पून तेल घालून त्यात बारीक चिरलेला लसूण, आले, हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
- 8
त्यानंतर त्यात पातीचे कांदे, रेड चिली सॉस, आणि ग्रीन चिली सॉस ऍड करावे.
- 9
आता त्यात सोया सॉस आणि शिमला मिरची घालून 1 ते 2 मिनिटे फ्राय करून घ्यावे.
- 10
व्हिनेगर ऍड करावे. तयार ग्रेव्ही अशी दिसेल.
- 11
आता एका वाटीत 1 कॉर्न फ्लोअर घेऊन त्यात पाणी घालून याचे बॅटर ग्रेव्हीत हळूहळू ओतावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. तयार ग्रेव्हीत थोडेसे मीठ घालावे आणि मध्यम आचेवर ग्रेव्हीला उकळी येवू द्यावी.
- 12
आता त्यात मंचुरीअन बॉल्स ऍड करावे. 1 मिनिटं उकळू द्यावे. व्हेज मंचुरीअन ग्रेव्ही तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes




































टिप्पण्या (6)