तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)

आईच्या हातचे #Md
" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.
माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊

कुकिंग सूचना
- 1
पहिले तर तांदूळ स्वछ धुवून एक रात्र भिजवून ठेवावे. सकाळी सकाळी ते तांदूळ सुती कपड्यात उपसुन ठेवावे.
- 2
साधारण एक तास तरी तांदूळ निथळत ठेवावेत. कोरडे होऊ द्यायचे तांदूळ
- 3
मग एका कढईत मिडीयम गॅसवर तांदूळ खरपुस भाजुन घ्या.
- 4
मग एका ताटात काढुन ठेवावे. तांदूळ थंड होऊन दयायचे.
- 5
थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक करावे.
- 6
मग गुळ किसून घ्यावे परातीत आणि साजुक तुप गरम करून गुळात घालावे.छान पातळ होते बॅटर.मग तांदूळ पीठ वेलची पूड काजु बदामाचे काप घालून एकजीव करून घ्यावे.
- 7
तांदळाचे लाडू करून घ्यावे.
- 8
तांदळाचे लाडू आईच्या हातचे तयार..
Keywords
Similar Recipes
More Recipes
- टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
- राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
- पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
- बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)

टिप्पण्या