विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा (saoji anda serva recipe in marathi)

नागपूरचे पर्यायी नाव काय, असे कुणी विचारले तर साहजिक उत्तर येईल, ‘संत्रानगरी’... पण पट्टीच्या खवय्यांना विचारा, ते आणखी एक नाव जोडतील. ते म्हणजे, ‘सावजीनगरी’.
नागपूर हे खवय्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे ते फक्त सावजीसाठीच. बाहेरगावचे असो वा परराज्याचे लोक. नागपूरला आल्यावर ते सावजीचा आस्वाद न घेता परतणे शक्य नाही! झणझणीत नागपूरची ही झणझणीत ओळख आहे. अनेकांची जीभ आणि पोट तृप्त करणारा हा सावजी प्रकार नेमका आला कसा, याची कहाणीही तेवढीच रुचकर आहे.

कुकिंग सूचना
- 1
पॅनमधे तेल गरम करून त्यात लाल तिखट,हळद,मीठ घालून त्यात उकडलेली अंडी घालून ५ मि.फ्राय करा.
- 2
दुसऱ्या पॅनमधे सर्व खडे मसाले तेल,कांदा, टोमॅटो,आलं, लसूण घालून परतून घ्या. नंतर हे मिश्रण थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात
जीरे,कांदा लालसर परतून घ्या. नंतर त्यात सर्व मसाले,मीठ घालून छानपरतून घ्या. नंतर त्यात वाटलेले वाटत घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या - 4
आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही मंद आऊ १० मि.शिजवून घ्या. व नंतर त्यात फ्राय केलेली अंडी, कोथिंबीर घालून मध्यम आचेवर १५ मि.शिजू द्या.
- 5
सावजी अंडा करी खाण्यासाठी तयार..😋😊
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या