कोल्हापुरी सुक्क मटण (sukha mutton recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

कोल्हापूर म्हटलं की आपल्याला फक्त तांबडा पांढरा रस्सा साठवतो पण अस्सल खवय्या ला खुणावते ते म्हणजे कोल्हापुरी सुक्क मटण चला तर मग आपण पाहू या त्याची रेसिपी
#KS2

कोल्हापुरी सुक्क मटण (sukha mutton recipe in marathi)

कोल्हापूर म्हटलं की आपल्याला फक्त तांबडा पांढरा रस्सा साठवतो पण अस्सल खवय्या ला खुणावते ते म्हणजे कोल्हापुरी सुक्क मटण चला तर मग आपण पाहू या त्याची रेसिपी
#KS2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दीड तास
चार जणांसाठी
  1. 1/2 किलोमटण
  2. 4कांदे
  3. 2गड्डे लसुण
  4. 1 कपखोबरे
  5. 3/4 कपतेल
  6. 2 चमचेआद्रक लसुन पेस्ट
  7. 2 चमचेकोल्हापुरी कांदा लसूण मसाला
  8. 1 चमचाकाश्मिरी लाल तिखट
  9. 1/2 कपकोथंबीर
  10. 2 चमचे धणे पावडर
  11. 1 चमचाजीरा पावडर
  12. 2 चमचेखडे मीठ
  13. 1 चमचागरम मसाला

कुकिंग सूचना

दीड तास
  1. 1

    सर्वात अगोदर मटण स्वच्छ धुऊन त्याला हळद,खडेमीठ आणि धना पावडर लावून मॅरीनेट साठी अर्धा तास ठेवणे

  2. 2

    मटण मॅरीनेट होत आहे तोपर्यंत आपण 1 मेडीयम कांदा बारीक कट करून घेणे आणि दोन चमचे खोबरे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर याचे वाटण करून घेणे

  3. 3

    आता पातेल्यात दोन चमचे तेल टाकून त्यावर बारीक कट केलेला कांदा छान गुलाबी रंगावर परतणे. आता त्यात आपण केलेले वाटण टाकणे. वाटण छान परतून घेणे.

  4. 4

    आता त्यात मटण टाकून छान परतून घेणे. आता पातेल्यावर झाकण ठेवून त्यात पाणी टाकणे व झाकनातील पाणी लागेल तसे टाकून मटण शिजवून घेणे.

  5. 5

    आता आपल्याला भाजलेले वाटण तयार करण्यासाठी दोन कांदे, चार चमचे खोबरे एक चमचा लसुन आणि अद्रक हे सगळे थोड्या तेलावर भाजून घेणे. आणि मसाला छान गंधा सारखा वाटून घेणे.

  6. 6

    आता आपल्याला मटण फ्राय करण्यासाठी 1 कांदा परतून त्यात कांदा लसूण मसाला काश्मिरी लाल तिखट गरम मसाला धना जीरा पावडर टाकणे. भाजून केलेले वाटण दोन चमचे टाकणे आणि मटण टाकून छान तेल सुटेपर्यंत परतणे

  7. 7

    मटण परतून झाल्यावर आळणी पाणी एक वाटी टाकने आणि मटण आठ दहा मिनिट छान शिजवून घेणे वरून कोथिंबीर टाकून गार्निश करणे आपल्या आवडीनुसार भाकरीबरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes