आंब्याचा रस आणि शेवया (ambyacha ras ani sheviya recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
उन्हाळ्यात रस आणि शेवया हा सर्वांचा आवडता प्रकार आहे.
आंब्याचा रस आणि शेवया (ambyacha ras ani sheviya recipe in marathi)
उन्हाळ्यात रस आणि शेवया हा सर्वांचा आवडता प्रकार आहे.
कुकिंग सूचना
- 1
रसाच्या आंंब्याचे खूप प्रकार मिळतात.जसे हापूस,केशर,दशहरी. आपल्याला जो आवडेल तो घेऊन स्वच्छ धुवून सोलून घ्यावेत.
- 2
छोटे छोटे पिसेस करून घ्यावेत. मिक्सरमध्ये साखर व आंब्याचे तुकडे घालून फिरवून घ्यावे.विलायची घालावी.आवडत असल्यास दुध घालावे.. शेवया उकळण्यासाठी एका भांड्यात पाणी ठेवावे.
- 3
उकळत्या पाण्यात दोन टेबलस्पून तेल घालावे.शेवया घालून गॅस मंद करावा.शेवया पटकन शिजतात.लगेच चाळणीत काढून वरून थंड पाणी ओतावे.म्हणजे मोकळ्या होतात.रस आणि शेवया खाण्यास तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15078130










टिप्पण्या