मिक्स पिठाची बटाटा पुरी (mix pithachi batata puri recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#pe
खरंतर या पुऱ्या आमच्याकडे दिवाळीत रोज करतात आणि त्या दह्या बरोबर किंवा घट्ट वरना बरोबर खातात पण मी मागे एकदा यात बटाटा घालून करून बघितल्या तर खूपच सुंदर लागतात चला तर मग पाहूया याची रेसिपी.....

मिक्स पिठाची बटाटा पुरी (mix pithachi batata puri recipe in marathi)

#pe
खरंतर या पुऱ्या आमच्याकडे दिवाळीत रोज करतात आणि त्या दह्या बरोबर किंवा घट्ट वरना बरोबर खातात पण मी मागे एकदा यात बटाटा घालून करून बघितल्या तर खूपच सुंदर लागतात चला तर मग पाहूया याची रेसिपी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
चार जणांसाठी
  1. 3 कपज्वारीचे पीठ
  2. 1 कपगहू पीठ
  3. 1 कपबेसन पीठ
  4. 1 चमचालसूण
  5. 1 चमचाजीरे
  6. 1/2 चमचाओवा
  7. 10-12 हिरव्या मिरच्या
  8. 2 चमचामीठ
  9. 2 कपतेल
  10. 1/2 कपकोथिंबीर
  11. 2उकडलेले बटाटे
  12. 1/2 चमचाहळद
  13. 1 चमचालाल तिखट
  14. 2 चमचापांढरे तीळ
  15. 1 चमचाधने पावडर

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वात अगोदर लागणारे साहित्य एकत्र जमून घेणे.

  2. 2

    आता हिरवी मिरची जाडसर वाटून घेणे आणि लसूण जीरे व मीठ बारीक वाटून घेणे. उकडलेला बटाटा किसून घेणे.वरील सर्व पीठ आणि मसाले एकत्र करून घेणे आणि लागेल तसे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेणे.

  3. 3

    आता मळलेल्या पिठाची एकच मोठी पोळी लाटून छोट्या पुऱ्या करून घेणे किंवा सिंगल सिंगल बनवणे. कढईत तेल तापत ठेवून खरपूस तळून घेणे.

  4. 4

    कढईत तेल तापत ठेवून पुऱ्या मिडीयम आचेवर खरपूस तळून घेणे दह्या बरोबर किंवा सॉसबरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes