अंबाडी कण्या भाजी (ambadi kanya bhaji recipe in marathi)

अंबाडीची भाजी खूप पौष्टिक आहे.जेंव्हा ही भाजी मिळते.तेंव्हा आवर्जून खाल्ली पाहिजे.चवीला खूप छान लागते.ज्वारी किंवा तांदुळाच्या कण्या लावून मस्त लागते.मी तांदळाच्या कण्या लावून केली.

कुकिंग सूचना
- 1
अंबाडीच्या भाजीची पाने तोडून धूवुन घ्या. फोडणीचे सर्व साहित्य तयार ठेवावे.कण्या थोडा वेळ भिजत ठेवावे.व नंतर मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्या.
- 2
अंबाडीची भाजी कुकर मध्ये शिजवून घ्यावी.रवीने छान मिक्स करावी. आता गॅस वर भांडे ठेवून त्यात तेल तापत ठेवावे. जिरं, मोहरी तडतडले की लसूण लालसर होऊ द्यावा.मिरची, हळद व कांदा घालावा.भाजी ओतावी.भाजीच्या अंदाजानुसार पाणी घालावे.
- 3
मीठ व गूळ घालून उकळी येऊ द्यावी.व कण्या लावून शिजू द्यावी.भात, पोळी किंवा भाकरी सोबत अप्रतिम लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या