काजून पोटॅटो वेजेस (potato Wedges recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#pe

काजून पोटॅटो वेजेस (potato Wedges recipe in marathi)

#pe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3मोठे बटाटे
  2. 1 टीस्पूनकाळा मीठ
  3. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  4. 1 टीस्पूनमिक्स हार्ब
  5. 1 टीस्पूनहॉट पेपरीका
  6. 1 टीस्पूनचीली फ्लेक्स
  7. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  8. 1 टेबलस्पूनऑलिव्ह ऑइल

कुकिंग सूचना

  1. 1

    तीन मोठे बटाटे न सोलता वेजेस मध्ये कापून घ्यावे... माती थोडी जास्त असेल तर सुरीच्या पाठच्या बाजूने थोडं क्लिअर करून घ्या... कापलेले बटाटे साधारण दहा मिनिटे पाण्यामध्ये ठेवा...

  2. 2

    बटाट्यातला पाणी काढून घेऊन त्यात वर दिलेले सर्व स्पायसेस मिक्स करून घ्यावे... पेपरीका नसेल तर त्याऐवजी प्लेन मिरची पावडर वापरू शकता... सर्व मसाले मिसळून घेऊन मग त्यात लिंबाचा रस घालावा...

  3. 3

    मग त्यात ऑलिव ऑइल घालून सर्व मिसळून घ्या... ऑलिव ऑइल नसेल तर बटर वापरा किंवा घरगुती तेल वापरा... ऑलिव ऑइलचा फ्लेवर जास्त छान लागतो...

  4. 4

    आता ह्या नंतर तुम्ही हे बेक करून घेऊ शकता, पण बेकिंग साठी साधारण 35 ते 40 मिनिटे लागतात... मी मायक्रोवेव केले... मिडीयम हाय हीट वर 3 मिनिटाच्या इंटरवलने काढून एकदा ढवळून पुन्हा तीन मिनिटे लावावे... असे चार वेळा लावावे म्हणजे एकूण बारा मिनिटे... खात्रीसाठी टूथपिक च्या सहाय्याने तुम्ही मध्ये मध्ये चेक करू शकता... बेकिंग पेक्षा मायक्रोवेव्हमध्ये झटपट होतात... तुम्ही फ्राय करण्याच ऑप्शनही वापरू शकता...

  5. 5

    खरं तर आपले काजूनपोटॅटो वेजेस तयार आहेत... अतिशय कमी मेहनतीत झटपट होणारा पदार्थ तुम्ही स्टार्टर म्हणून वापरू शकता...

  6. 6

    चीज आवडत असेल तर वरून किसलेले चीज घालून अजून अर्धा मिनिट मायक्रोवेव्ह करून घ्या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes