आशाड रेसीपीज थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका परातीत थालीपीठ च पीठ घ्या त्यात आता कांदा, टॉमेटो, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद,जीर व कोथिंबीर मीक्स करून घ्या आता यात थोड थोड पाणी घालून पीठ मळुन घ्या.
- 2
आता एक तवा गरम करत ठेवा. आता एक पोलपाट किंवा ताट घ्या त्यावर एक सुती कपडा/रूमाल पाण्यात भिजवून पोलपाटा वर ठेवा. आता आपला हात ओला करा व पीठाचा गोळा घ्या व ओला कपडा वर ठेवा व पाण्याचा हातानं थापुन घ्या मधोमध एक होल पाडा व अलगद कपडा उचलून तव्यावर थालीपीठ उलटवा आता वरून थोडा दाब द्या व कपडा काडून घ्या.
- 3
दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या खाण्या साठी तयार आहेत थालीपीठ. तुम्ही हे थालीपीठ लोणी,टोमॅटो सॉस, दही बरोबर सर्व करु शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15259751









टिप्पण्या