भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

#EB2 #W2 #रेसिपी इ बुक चॅलेंज वांगी खाण्याचे शारीरीक फायदे भरपुर आहेत वांग्यात फायबर व बिया असतात त्यामुळे पोट बऱ्याच वेळ भरलेले राहाते. वांगे हे लोह व कॅल्शियम ने समृद्ध असतात त्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी व हाडांच्या आरोग्यासाठी खुप महत्वाचे आहेत. वांगे मधुमेह नियंत्रित करते. वजन कमी करते त्यात कमी कॅलरीज असतात हृदयविकाराचा धोका कमी असतो . अशा फायदेशीर वांग्याची भरली वांगी रेसिपी चला आपण बघुया

कुकिंग सूचना
- 1
वांगी स्वच्छ धुवुन कोरडी करून त्यांना उभ्या चिरा पाडुन घ्या डिशमध्ये वांग्यात भरण्याचा सर्व मसाल्याचे साहित्य काढुन घ्या त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, खोवलेले ओले खोबरे, भाजलेले सुके खोबर्याचा किस, धनेपावडर, जिरेपावडर, कांदालसुण मसाला, काश्मिरीतिखट, घरगुती तिखट, आल लसुण पेस्ट, गुळ, चिंचेचा कोळ, हळद, मीठ, चिरलेली कोथिंबीर
- 2
डिशमधील सर्व साहित्य मिक्स करून घ्या हा तयार मसाला वांग्याच्या चिरांमध्ये भरून घ्या
- 3
छोटया कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जीरे हिंग कडिपत्त्याची फोडणी करून त्यात मसाला भरलेली वांगी सोडा २ मिनिटांने वांगी हळुवार परतुन घ्या नंतर त्यात उरलेला मसाला व आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा व कुकरचे झाकण लावुन मध्यम गॅसवर १०-१५ मिनिटे शिजवा
- 4
आपली भरली वांगी खाण्यासाठी रेडी
- 5
झणझणीत भरली वांगी डिशमध्ये सर्व्ह करा वरून चिरलेली कोथिंबिर भुरभुरा
Top Search in
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)