कचोरी (kachori recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

कचोरी (kachori recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
५-६ जण
  1. 2 कपमैदा
  2. 1/2 टेबलस्पूनमीठ
  3. 1/2 टेबलस्पूनओवा
  4. 5 टेबलस्पूनतूप
  5. 2 कपमूगडाळ
  6. 1 कपबेसन पीठ
  7. 1 टेबलस्पूनजीरे
  8. 1 टेबलस्पूनधने
  9. 1 टेबलस्पूनबडीशोप
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. आलं, हिरवी मिरची व लसूण पेस्ट
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  14. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  15. चवीनुसारमीठ
  16. 1/2 टेबलस्पूनचाट मसाला
  17. तळण्यासाठी तेल
  18. 2 टेबलस्पूनकस्तुरी मेथी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्व प्रथम मूगडाळ २ तास भिजत ठेवा.

  2. 2

    आता पराती मध्ये मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका व ओवा हातावर थोडा चोळून घेऊन टाका व नंतर त्यात तुपाचं मोहन टाका व त्याला मिक्स करा. मैद्यामध्ये मोहन चे प्रमाण कमी पण नको आणि जास्त ही नको त्या करता हाताने मैदा मुठीत धरून त्याचा लाडू बनतो का त बघा. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ जास्त घट्ट पण नको व पातळ पण नको.

  3. 3

    पीठ मळून झाले आहे. आता पीठ १५ मिनिटे झाकून ठेवा

  4. 4

    डाळ पाण्यातून काढून निथळत ठेवा डाळीचे पाणी निथळले की डाळ मिक्सरमधून थोडी जाडसर वाटून घ्या.

  5. 5

    आता मिक्सर मधून धने, बडीशोप व जीरे जाड सर वाटून घ्या.

  6. 6

    आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाका तेल गरम झाले की आपण हिरवी मिरची आले लसूण पेस्ट व मिक्सर मधून काढलेलं धने जीरे बडीशोप टाका. गॅसची फ्लेम मंद ठेवून १-२ मिनिटे हलवून त्यात आता बेसन पीठ घालून चांगले परतून घ्या.

  7. 7

    बेसन पिठाचा आता मस्त वास येतो आहे आता त्यामध्ये वाटलेली डाळ टाका डाळीला पण चांगलं परतून घ्या डाळ परतत आली की त्यामध्ये लाल मिरची पावडर,गरम मसाला, हळद, धने पावडर,चाट मसाला,चवीनुसार मीठ व कस्तुरी मेथी हातावरती चोळून टाका व सर्व मिश्रण एकजीव करा.५ मिनिटांनी गॅस बंद करून कचोरी चा मसाला थंड करायला ठेवा.

  8. 8

    मसाला थंड झाला आहे आता त्याचे लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्या.

  9. 9

    आता आपलं पीठ चांगल्या प्रकारे भिजलं आहे. आता त्याचे लिंबाच्या आकाराचे एवढे गोळे तयार करून घ्या.एक गोळा हातात घेऊन त्याला अजून चांगल्या प्रकारे मळून गोल करून घ्या व मध्ये प्रेस करा आणि त्याला वाटीचा आकार द्या व त्याच्यामध्ये मसाल्याचा एक गोळा ठेवून चारी बाजूने आपण मोदक करतो तसं मोदक करा व त्याचा शेंडा काढून टाका व त्याला हलक्या हाताने प्रेस करत राहा फक्त मध्यभागीच प्रेस करायचा आहे बाजूनी हलक्या हाताने दाबायचे प्रेस करायचं नाही.

  10. 10

    आता आपल्या कचोरी बनवून तयार आहेत आता गॅसवर कढई ठेवा कढई मधे तेल तापत ठेवा.कचोरी आपल्याला मंद आंचेवर तळायची आहे. तेल गरम झालं आहे. आता कचोरी कढईमध्ये टाका गॅस मंद आचेवर ठेवा.आता बघा कचोरीला बुडबुडे येऊ लागलेले आहेत ती एका बाजूने चांगली तळल्या गेली आहे.त्याच्या वरती कढईतलं तेल टाकत जा.आता कचोरी दुसऱ्या साईडने पण तळून घ्या.

  11. 11

    आता कचोरी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाल्यावर प्लेट मधे काढून घ्या. व गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Khup ChhanAll your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes