मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#EB2
#W2
#ईबुक रेसिपी चॅलेंज
कचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरी
मैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकता
कचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुया
आणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. सारणासाठी लागणारे साहित्य
  2. 1/2 कपमुगडाळ
  3. 1 चमचातेल
  4. 1/2 टेबलस्पूनहळद
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टेबलस्पूनजीरे पावडर
  7. 1 टेबलस्पूनधने पूड
  8. 1 चमचाबडीसोप पावडर
  9. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  10. चवीनुसारमीठ
  11. चवीनुसारसाखर
  12. आवरणासाठी लागणारे साहित्य
  13. 2 कपमैदा
  14. 1/2 कपपाणी
  15. 1 टेबलस्पूनमोहन साठी तूप किंवा तेल
  16. चवीनुसारमीठ
  17. तळण्यासाठी तेल
  18. सजावटीसाठी शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम एका बाउल मध्ये मैदा घ्या आणि त्यात मोहनासाठी तेल किंवा तूप घालून घ्या चवीनुसार मीठ घाला सर्व व्यवस्थित मिसळून घ्यावे पिठाचा जर मुटका बनत असेल तर समजावे आपण जेवढे तेल किंवा तूप घातले ते व्यवस्थित आहे आता मैदा मध्ये थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्या हा गोळा पंधरा-वीस मिनिटं बाजूला झाकून ठेवू या

  2. 2

    मूग डाळ घेवून दोन ते तीन तास भिजत घालावी नंतर तिचे पाणी काढून पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्यावी

  3. 3

    आता एक पॅन किंवा भांडे घेऊन ठेवावे त्यात तेल घालावे तापले की त्यात हळद जीरे पावडर धने पावडर आमचूर पावडर लाल तिखट सर्व मसाले घालून घ्यावे सर्व एकत्र करून व्यवस्थित परतून घ्यावे त्यानंतर वाटलेली मूग डाळ घालावी व परत सर्व मिश्रण एकत्रित हलवून घ्यावे त्यात चवीनुसार मीठ घालावे मंद आचेवर परतून घ्यावे हे मिश्रण थंड झाले की त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यावे आता मळलेल्या मैदा चा गोळा घेऊन तो व्यवस्थित करावा आणि त्याची पुरी लाटून घ्यावी या पूरी मध्ये सारण भरा आवरण नीट बंद करा

  4. 4

    सारण भरल्यानंतर अगदी हलक्या हाताने दाबून ते बाजूला ठेवा आता ही कचोरी तयार झाली कचोरी तळण्यासाठी एक कढई येऊन त्यात तेल घालावे तेल तापले की कचोरी तळून घ्यावी अशाप्रकारे र्व कचोर्‍या तळून घ्याव्या

  5. 5

    अशाप्रकारे गरमागरम खस्ता कचोरी चिंचेच्या चटणी सोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes