मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)

हिवाळ्याची चाहूल लागली की, सर्वीकडे बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या तसेच हिरव्या कोवळ्या मटारचे ढीगच ढीग लागलेले दिसतात. आजकाल मटारचा खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.. मटारच्या शेंगा उकडून त्याला मीठ लावून देखील खाल्ल्या जातात..
उत्तरेतील पदार्थांमध्ये आलू मटर, मटर पनीर, पुलाव, मटर की कचोरी, मटर के पराठे लोकप्रिय आहेत...
तसेच आपल्या महाराष्ट्रात मटारच्या मसालेभात, रस्सेदार उसळ, फ्लॉवर मटार रस्सा, मटर पॅटीस हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
आज मी यातलाच एक पदार्थ म्हणजेच *मटर पॅटीस* ची रेसिपी सांगणार आहे.
यामध्ये पारीसाठी पोटॅटोचा वापर न करता ब्रेड चा वापर करून तसेच डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केलेले आहे. पण तरीही चवीला अप्रतिम झालेत. .. तेव्हा नक्की ट्राय करा हिरव्या कोवळ्या मटारचे पॅटिस... 💃 💕

कुकिंग सूचना
- 1
मटारच्या दाणे काढून घ्यावे. व हे दाणे मिक्सरला लावून ओबडधोबड वाटून घ्यावेत. हिरव्या मिरच्या मिक्सर मधून वाटून घ्याव्यात.
- 2
पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की, त्यात मोहरी घालावी. मोहोरी तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. एक मिनिटं परतल्यानंतर त्यात बारीक केलेली हिरवी मिरची घालावी. नंतर त्यामध्ये धने पावडर, जीरे पावडर, हिंग, गरम मसाला घालून मिक्स करून घ्यावे. व एक मिनिट होऊ द्यावे.
- 3
आता यामध्ये बारीक केलेले हिरवे मटर घालावे. आता यामध्ये मॅश केलेला बटाटा घालावा. चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, थोडीशी साखर, खोबरा कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करावे व झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. गॅस बंद करून द्यावा व सारण थंड होण्यासाठी ठेवावे
- 4
आता या सारणाचे छोटे-छोटे लिंबाएवढे गोळे तयार करून घ्यावे. ब्रेड च्या स्लाईस च्या कड्या कापून घ्यावा. व एक एक ब्रेड पाण्यामधून काढून हलक्या हाताने दाबून त्यातले पाणी पूर्ण काढून घ्यावे. व पारी तयार करून त्याला वाटीसारखा आकार देऊन,तयार केलेल्या सारण्याचा गोळा त्यात ठेवून, त्याला हलक्या हाताने तोंड बंद करून, हलकेच दाबून,चपटा आकार देऊन पॅटिस तयार करून घ्यावे.
- 5
तयार पॅटिस ब्रेडच्या चुर्या मध्ये म्हणजेच ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्यावेत. व तव्यावरती किंचित तेल घालून मध्यम आचेवरती गोल्डन कलर येईस्तोवर शॅलो फ्राय करून घ्यावे.दृष्टीने
- 6
तयार आहे आपले मटर पॅटिस...
हे पॅटीस हिरव्या चटणी सोबत, टोमॅटो केचप सोबत गरमागरम सर्व्ह करावे.. 💃 💕 - 7
- 8
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या