खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमतांदूळ
  2. 125 ग्रॅमचणाडाळ
  3. 5-6हिरव्या मिरच्या
  4. 1/2 वाटीदही
  5. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  6. 2 टीस्पूनतेल
  7. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  8. 2 पिंचबेकिंग सोडा
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनसाखर
  11. चवीनुसारमीठ
  12. तडक याकरीता साहित्य
  13. 1 टीस्पूनमोहरी
  14. 1 टीस्पूनजीरे
  15. 10-12 कढीपत्त्याची पाने
  16. सजावटी करिता साहित्य
  17. कोथिंबीर
  18. नारळाचा कीस

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास भिजत घाला, व नंतर मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. वाटलेले मिश्रण रात्रभर फर्मेंट करायला ठेवून द्या.

  2. 2

    दुसऱ्या दिवशी फरमेंट झालेल्या मिश्रणात हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आले लसूण पेस्ट, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा,हळद,मीठ,दही तसेच तेल घालून मिश्रण एकाच दिशेने छान फेटून घ्या. आवश्यक असल्यास पाणी घाला. भज्यांच्या बॅटर प्रमाणे बॅटर असावं.

  3. 3

    आता एका पसरट पातेल्यात पाणी गरम करून,त्यावर एक स्टॅण्ड ठेवा व तयार ढोकळ्याचं बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या ताटात ओतून घ्या व त्या स्टॅंडवर ठेवून वर झाकण ठेवून द्या आणि ढोकळा हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या.

  4. 4

    आता एका तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जीरे, मोहरी,कढीपत्ता याची फोडणी तयार करून, त्यात अर्धा वाटी पाणी घाला. आता ढोकळा कट करून त्यावर ती फोडणी घालून घ्या व तयार ढोकळे कोथिंबीर आणि नारळाच्या कीसाने गार्निश करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes