व्हेज पोपटी (veg popati recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
व्हेज पोपटी (veg popati recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कुकर ची शिटी काढुन कुकर प्रिहिट करायला ठेवणे.
- 2
मातीचा मध्यम आकाराचे सुगड घेऊन त्याला आतुन तेल लावून घेणे.
- 3
मेथी सोडून दिलेल्या सर्व भाज्या... एका मोठ्या भांड्यात घेऊन दिलेला मसाला घालून एकजीव करून घ्यावे.
- 4
तेल लावलेल्या सुगडमधे तळाला मेथी पसरून घालावी.मेथी चिरायची नाही. देठाचा भाग कापुन काड्या सहीत मेथी वापरायची
- 5
मेथी घातलेवर..यावर मिक्स भाज्यांचा थर लावून घ्यावे.
- 6
केळीची पानाने सुगड पॅक करून घ्यावे.
- 7
इकडे कुकर प्रिहिट झाला आहे.आता भाज्यांचे सुगड कुकर मधे उलटे करून म्हणजे सुगड चे तोंड खालच्या बाजूला करून ठेवावे.
- 8
कुकर मधे पाणी घालायचे नाही.
- 9
मध्यम आचेवर एक तास ठेवणे. नंतर बंद करून 15 मिनिटांनंतर कुकर उघडून सुती कापडाने सुगड हलकाच काढुन घ्या.
- 10
गरमागरम पोपटी खायला तयार.
उपलब्ध असलेल्या सर्व भाज्या वापरु शकतो.
पाला ही मेथीचा हवा अस नाही.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15914542




टिप्पण्या (4)