बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)

बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन मॅरिनेट करून घ्यावे.
चिकन 2/3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. - 2
एक पातेल्यात तेल गरम करून त्यात बेसन हलकाच भाजुन घेणे. यात काश्मिरी लाल मिरची पुड घालुन छान परतून घ्यावे. हे मिश्रण थंड करायला ठेवणे.
- 3
चिकनला हळद पुड, धणेपुड, जिरेपुड, चिकन 65 मसाला, गरम मसाला, आल- लसुण पेस्ट लावा.चवीनुसार मीठ, मिरची पुड घालुन लिंबू पिळावा.
- 4
दही फेटून घ्यावे. भाजलेले बेसन वरील चिकनवर घालावे.कसुरी मेथी, चाट मसाला, लाल कलर घालुन चिकन एकजीव करून घ्यावे.
हे मॅरिनेट चिकन फ्रिजमधे 4/ 5 तास ठेवणे. - 5
हे मॅरिनेट चिकन ग्रील करून घ्यावे. ग्रील करायचे आधी हे मॅरिनेट चिकन फ्रिज मधुन दिड तास आधी बाहेर काढून ठेवावे.नंतर चिकन ग्रील करून घ्यावे.
- 6
आता ग्रेव्ही ची तयारी करून घेणे.
- 7
पातेल्यात दोन पळी तेल गरम करून त्यात दिलेला खडा मसाला घालून परतावे. कांदा - टोमॅटो चिरून घालावा. हिरवी मिरची घालावी.किंचित मीठ घालून परतून घ्यावे. कांदा- टोमॅटो पटकन शिजला जातो.हे मिश्रण चांगले भाजुन घ्यावे. थंड झाल्यावर भिजवलेले काजु घालून हे मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटप करावे. आपली ग्रेव्ही चे वाटण तयार.
- 8
पातेल्यात तेल आणि बटर गरम करून त्यातआलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. यात काश्मिरी लाल मिरची पुड, तिखट मिरची पुड, हळद,धणेपुड, जिरेपुड, गरम मसाला, घालून परतून घ्यावे.यातच मॅगी क्युब घालावी.
- 9
यात कांदा टोमॅटो चे वाटण घालुन छान परतून घ्यावे. तेल सुटले की मग चिकन चे फ्राय पीस घालुन 1/2 उकळी द्यावी.यात टोमॅटो केचप, क्रिम, कसुरीमेथी, चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून गॅस बंद करावा.
कोथिंबीर आवडीप्रमाणे घालावी. - 10
तिखट मिरची पुड & मीठ घालतेवेळी चव बघून घालावे.
चिकन मॅरिनेट करताना मीठ - मिरची पुड आणि
ग्रेव्ही मध्ये मीठ - मिरची पुड यामुळे अंदाज घ्यावा.
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या