खुसखुशीत चविष्ट पुरणपोळी (तेल पोळी) (Puranpoli recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#HSR
होळी स्पेशल

खुसखुशीत चविष्ट पुरणपोळी (तेल पोळी) (Puranpoli recipe in marathi)

#HSR
होळी स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम चणाडाळ
  2. १५० ग्रॅम गूळ
  3. १ वाटी साखर
  4. २ चमचे साजुक तूप
  5. २ चमचे वेलची पूड
  6. १ चमचा जायफळ पूड
  7. थोडे केशराचे धागे
  8. १५० ग्रॅम रवा
  9. १ चमचासाजुक तूप
  10. १/२ कप दूध

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम चणाडाळ २ वेळा स्वच्छ धुवून घेतली व ४ तास पाण्यांत भिजवून ठेवली. नंतर चाळीत डाळ बुडेल इतपत पाणी ठेवून डाळ कुकरमध्ये ५ शिट्ट्या घेऊन शिजवून घेतली.

  2. 2

    परातीमध्ये तूप व दूध घालून रवा छान मळून घेतला व ओले कापड घालून ४-५ तासासाठी बाजूला ठेवला.

  3. 3

    नंतर शिजलेलली डाळ छान मोडून ठेवली, एका भांड्यात २ चमचे तूप घालून त्यांत गूळ व साखर विरघळवून घेतली व नंतर मोडून ठेवलेल्या डाळीत ते मिश्रण घालून सर्व जिन्नस एकजीव केले व पुरण घट्ट होईपर्यंत शिजवले.

  4. 4

    नंतर शिजवलेले पुरण पुरणाच्या चाळणीवरून गाळून घेतले व त्यांत वेलची पूड, जायफळ पूड व दुधांत खलून ठेवलेले केशर घालून पुरण एकजीव करून त्याचे गोळे करून घेतले.

  5. 5

    नंतर रवा मिक्सरमधून कुटून लवचिक करून घेतला व एका भांड्यात तेल घेऊन त्यांत तो गोळा बुडवून ठेवला. नंतर त्यातला छोटासा गोळा घेऊन पोळीच्या पत्र्यावर पुरीच्या आकारा एवढा पसरवला व त्यांत पुरण भरून त्याचा गोळा करून घेतला व पत्र्यावर व लाटण्याला थोडे तेल लावून हलक्या हाताने पोळी लाटली.

  6. 6

    नंतर तवा मध्यम आचेवर ठेवून त्यावर तेल लावले व पत्र्याच्या सहाय्याने पोळी तव्यावर घातली व दोनही बाजूने खमंग भाजून घेतली व नारळाच्या दुधासोबत सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes