कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)

#Kkr
कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो.
चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया.

कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ घेवून धूवून घावी तीन तास पाण्यात भिजत घालावी तींन तासाने चणा डाळ एका चाळणीत काढून घ्यावी
- 2
चणा डाळ मिक्सरच्या भांड्यात घालवी त्यात हिरवी मिरची आल्याचा तुकडा व चवीनुसार मीठ साखर घालून घ्यावे पाणी न घालता भरडसर वाटून घ्यावी
- 3
वाटलेली डाळ एका वाटी किंवा भांड्यात काढून घ्यावी त्यात किसलेली कैरी घालून घ्यावी आता तडका देण्यासाठी तडका पॅन घेवून त्यात तेल घालावे जीरे मोहरी हिंग हळद घालून घ्यावी कडीपत्ता घालावा डाळीला छान खमंग फोडणी द्यावी सर्व मिश्रण एकत्र मिक्स करावे
- 4
छान खमंग कैरी डाळ तयार
Similar Recipes
More Recipes
- रवा - बेसन ढोकळा (Rava Besan Dhokla Recipe In Marathi)
- सेवया खीर (रमजान स्पेशल) (Sevai Kheer Recipe In Marathi)
- भोकराचे लोणचे (Bhokrache Lonche Recipe In Marathi)
- रताळे आणि बटाट्याची मिक्स उपासाची भाजी (Ratale Batata Mix Upvasachi Bhaji Recipe In Marathi)
- टेंडर कोकोनटआइसक्रीम (Tender Coconut Ice Cream Recipe In Marathi)

टिप्पण्या (5)