झटपट मिल्कपावडर पासून केशर पेढे.. (Instant Milk Powder Kesar Peda Recipe In Marathi)

#DDR. दिवाळी स्पेशल रेसिपी.....मी दिवाळीत लक्ष्मीपूजन साठी झटपट होणारे हे केशर पेढे नेहमी बनवत असते .....अगदी 10 मिनिटांत तयार होतात .... आणि दिवाळीत जेव्हा भेसळ युक्त खवा कींवा मावा बाजारात मिळतो ....म्हणून घरीच मिल्क पावडर पासून शुद्ध आणि सात्विक तयार होतात.. आणि चवेला एकदम सूंदर लागतात ....तर तुम्ही पण करून बघा आवडतील.....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळे साहित्य काढून घेणे..
- 2
गॅसवर एक पॅन गरम करणे त्यात वन टेबलस्पून तूप टाकणे....नंतर त्यात दूध टाकणे....
- 3
दूध थोडे गरम झाले की गॅस कमी करणे आणि हळूहळू दूधात मिल्क पावडर मिक्स करणे....
- 4
सतत हलवत राहाणे त्यात गुठळ्या होऊ नये म्हणून...नंतर त्यात साखर आणि दूधात भिजवलेले केशर टाकावे.....
- 5
मिश्रण घट्ट होत आले....पॅन सोडायला लागले की गॅस बंद करून मीश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणे.....थंड होऊ देणे ..
- 6
मीश्रण थंड झाले की हाताला थोडेसे तूप लावून छोटे छोटे गोळे करून पेढे तयार करून घेणे...वरून बदाम कतरन आणि केशर धागा लावून सजवणे आणि देवाला नेवेद्य दाखवणे....
Top Search in
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)