झणझणीत क्रॅब रस्सा (Crab Rassa Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#VNR #व्हेज/ नॉनव्हेज #राईस आणि करी रेसिपीस # दिवाळीचा गोड फराळ, मिठाई खाऊन कंटाळा आला ना तर चला नॉनव्हेज मधील झणझणीत क्र्यॉब रस्सा कसा करायचा ते बघुया

झणझणीत क्रॅब रस्सा (Crab Rassa Recipe In Marathi)

#VNR #व्हेज/ नॉनव्हेज #राईस आणि करी रेसिपीस # दिवाळीचा गोड फराळ, मिठाई खाऊन कंटाळा आला ना तर चला नॉनव्हेज मधील झणझणीत क्र्यॉब रस्सा कसा करायचा ते बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. 7-8मध्यम आकाराचे क्रर्यॉब
  2. २ टेबलस्पुन आलेलसुण ची जाडसर पेस्ट
  3. ५-७ कडिपत्याची पाने
  4. १-२ टेबलस्पुन कोथिंबीर
  5. १/८ टिस्पुन हिंग
  6. ४-५ कोकम
  7. १ टेबलस्पुन आलेलसुण पेस्ट
  8. ५० ग्रॅम वाटण( सुके व ओले खोबरे, आले, लसुण पाकळ्या, जीरे , कांदे,
  9. १/२ टिस्पुन हळद
  10. २ टेबलस्पुन घरगुती मसाला
  11. १ टेबलस्पुन फिश मसाला
  12. १ टिस्पुन धणे पावडर
  13. चविनुसार मीठ
  14. २-३ टेबलस्पुन तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    क्र्याब २-३ वेळा स्वच्छ धुवुन नंतर साफ करून घ्या. वाटणाचे साहित्य तेलावर परतुन नंतर थंड करून वाटण करून ठेवा. आले लसुण ठेचुन ठेवा, कोथिंबीर चिरून ठेवा

  2. 2

    मोठ्या कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात जीरे व आले लसणाचे जाडसर वाटण, कडिपत्ता, कोथिंबिर मिक्स करून परता नंतर त्यात तयार कांदा खोबर्‍याचे वाटण, हळद, घरगुती व फिश मसाला, धने पावडर मिक्स करून सतत परतत वाटण तेल सुटेपर्यंत परतत रहा

  3. 3

    नंतर त्यात साफ केलेले क्र्याब मिक्स करून २-३ मिनिटे परता सर्वमसाला क्र्याब ला लागेपर्यत त्यात मीठ व कोकम मिक्स करा

  4. 4

    २-३ मिनिटे चांगले परतल्यावर त्यात कोथिंबीर व आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा d परतुन कुकरवर झाकण ठेवा व शिजवा२५ मिनिटे

  5. 5

    नंतर चेक करून बघा शिजलय का नाहितर परत झाकण ठेवा व शिजवा शेवटी त्यात चिरलेली कोथिंबीर मिक्स करा

  6. 6

    तयार गरमागरम झणझणीत क्र्यॉब रस्सा बाऊलमध्ये घेऊन वरून कोथिंबिर पेरून सोबत उकडीची तांदळाची भाकरी, पोळ्या, कांदा लिंबुच्या स्लाइज, तांदळाच्या कुरडया व खारवड्या देऊन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
भारी, मी कधी खाला नाही. पण अवघड असतो करायला असं ऐकून आहे

Similar Recipes