चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)

#CCR
कुकर विथ कुकर
कुकर शिवाय आम्हा गृहीणीच पानच हलत नाही. पदार्थ लवकर शिजतात, कमी वेळात ,गॅस ची बचत .असे अनेक फायदे .
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#CCR
कुकर विथ कुकर
कुकर शिवाय आम्हा गृहीणीच पानच हलत नाही. पदार्थ लवकर शिजतात, कमी वेळात ,गॅस ची बचत .असे अनेक फायदे .
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चवळी स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
- 2
कांदा आणी खोबर भाजून घ्यावेत आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक फिरून घ्यावेत.
- 3
कुकर मधे तेल तापल्यावर मोहरी, जीरे फोडणी करुन. कांदा परतून घ्यावा.
- 4
नंतर त्यामधे टोमॅटो टाकून. हळद,हिंग, लाल तिखट, गोडा मसाला, गुळ टाकून छान मिक्स करावेत.
- 5
टोमॅटो आणी कांदा मसाल्यात छान मिक्स झाल्यावर त्यात वाटलेला मसाला टाकून परतून घ्यावेत.
- 6
नंतर त्यात चवळी टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून 3 ते 4 शिट्टी काढून गॅस बंद करावा.
- 7
कुकर थंड झाल्यावर चवळीची उसळ कोथिंबीर घालून खाण्यास द्यावेत.
Top Search in
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या