मटण बिर्याणी खास कुकपॅड टीमसाठी (Mutton Biryani Recipe In Marathi)

मटण बिर्याणी खास कुकपॅड टीमसाठी (Mutton Biryani Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटण स्वच्छ धुवून त्याला हळद, संडे मसाला, मीठ व आल, लसूण, मिरची, व खडा मसाला घालून वाटलेली पेस्ट व १ टी स्पून तेल घालून छान मॅरिनेट करून १५ मिनीटांसाठी बाजूला ठेवले.
- 2
प्रथम तांदूळ २ वेळा धुवून थोडे पाणी घालून २० मिनीटे भिजत ठेवले. एका भांड्यात ८ पेले पाणी तापत ठेवले. त्यांत २ टी स्पून मीठ, १ टी स्पून साजूक तूप, १ मसाला वेलची, २ तमालपत्र, १ दालचिनीचा तुकडा घालून छान उकळी काढली व त्यांत धुतलेले तांदूळ ८०% शिजू दीले व निथळून ठेवले.
- 3
एका कढईत बटाट्याच्या चकत्या, ऊभा चिरलेला कांदा व काजू तळून बाजूला करून ठेवले.
- 4
नंतर एका भांड्यात ४ टे. स्पून तेल तापवून त्यांत, लवंग, वेलची, दालचिनी, तमालपत्र व ६-७ काळे मिरे घालून फोडणी करून घेतली व त्यांत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व १ टी स्पून आल, लसणाची पेस्ट सवताळून घेतली, त्यावर काश्मिरी मिरची पावडर व दही घालून त्यावर मॅरिनेट केलेल मटण घातल व छान सवताळून त्यांत १ पेला पाणी घालून मटण शिजवून घेतले.
- 5
बिर्याणी करण्याच्या भांड्यात तूप तापवून ते सर्व भांड्याला पसरवून घेतले. नंतर त्यांत तयार मटणाचा १/२ भाग घातला, त्यावर शिजवलेल्या भाताचा थर घातला, त्यावर तळलेला बटाटा, कांदा बारीक चिरलेला पुदीना, बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवली, त्यावर मटणाचा थर दीला. त्यावर भाताचा थर, त्यावर बटाटा, कांदा, पुदीना, कोथिंबीरीची थर दीला व परत भाताचा थर देवून त्यावर तळलेला कांदा, काजू केशराचे दूध पसरवले व त्या बिर्याणी मधे छिद्र करून त्यांत उरलेला मटणाचा रस्सा व साजूक तूप घालून १५ मिनीटांसाठी दणदणीत वाफ काढली.
- 6
१५ मिनिटानंतर छान गरमागरम मटण बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या