गाजर मटार भाजी (Gajar Matar Bhaji Recipe In Marathi)

#HV
हिवाळा स्पेशल रेसिपी.थंडीच्या सिझनमध्ये फ्रेश मटार आणि गाजर भरपूर मिळतात .अगदी झटपट कांदा लसूण न वापरता हिवाळा स्पेशल कॅरेट मतदार भाजी तयार केली आहे

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी गाजर स्वच्छ धुऊन साल काढून गाजराच्या मिडीयम साईजच्या फोडी करून घ्याव्यात नंतर कडे मध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ताटाकून तडका करून घ्यावा
- 2
तडका तयार झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला गाजर टाकावा.आणि दोन मिनिट परतून घ्यावे
- 3
गाजर परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी फ्रेश मटार टाकावेत आणि मिक्स करून घ्यावे नंतर झाकण ठेवून ५ मिनिट वाफ येऊ द्यावी. अधून मधून झाकण काढून भाजी हलवून घ्यावी
- 4
भाजीला छान वाफ आल्यानंतर झाकण काढून घ्यावे नंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून भाजी मिक्स करून घ्यावी आणि त्यावरती झाकण ठेवून अजून एक वाफ आणावी
- 5
मसाले आणि भाजीला छान वाफ आल्यानंतर भाजी पूर्ण शिजल्यानंतर त्यावरती मॅगी मसाला मॅजीक आणि बारीक चिरलेली कोथिंबीरटाकून मिक्स करून घ्यावे
- 6
तयार आहे आपली झटपट तयार होणारी गाजर मटार भाजी
मॅगी मसाला येमॅजिक टाकल्यामुळे भाजीचा स्वाद आणखी छान लागतो - 7
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या