छोले मसाला (Chole Masala Recipe In Marathi)

#DR2 रात्रीच्या जेवणात काय बनवायचे असा प्रश्न नेहमी च पडतो. मग माझा आजचा बेत...
छोले मसाला (Chole Masala Recipe In Marathi)
#DR2 रात्रीच्या जेवणात काय बनवायचे असा प्रश्न नेहमी च पडतो. मग माझा आजचा बेत...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम २ कप काबुली चणे ६ तास भिजवून नंतर त्यातील पाणी काढून ते धुवून कुकरमध्ये पाणी घालून शिजवून घ्यावे.
- 2
आता गॅस चालू करून तो मंद आचेवर ठेवून त्यावर एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात १ तमालपत्र वेलची, जीरे, राई, बारीक चिरलेला कांदा चांगला परतवून घ्या. नंतर त्यात खोबरे कांदा लसूण ३ चमचे वाटण घालून त्यात वरून बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, लाल तिखट, छोले मसाला,चवीनुसार मीठ घालून हे मिश्रणाला तेल सुटेपर्यंत शिजू दया.
- 3
आता तेल सुटले की त्यात कुकरमध्ये वाफवून घेतलेले काबुली चणे त्यातील थोडे चणे मिक्सरला लावून जाडसर वाटून ह्या टोमॅटो कांदा मिश्रणात ओतून २ मिनिटे शिजू दया. नंतर बाॅईल काबुली चणे वरील मिश्रणात ओतून त्यात थोडे पाणी घालून १५-२०मिनिटे शिजू दया.
- 4
आता झाकण काढून वरून कसुरी मेथी बारीक कश् करून पेरावी. आणि आल्या चे बारीक उभे काटया घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
Top Search in
Similar Recipes
More Recipes








टिप्पण्या