गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
#DR2
रात्रीच्या जेवणात मला आमटी भात आवडतो. हलका आहार .
गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)
#DR2
रात्रीच्या जेवणात मला आमटी भात आवडतो. हलका आहार .
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम डाळ तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यावीत. शिकवताना किंचित हळद व थोडेसे तेल टाकावे.
- 2
शिजलेली डाळ घोटून घ्यावी. तेलाची मोहरी,जीरे,हिंग, हळद, लसूण कढीपत्ता घालून फोडणी करावी.
- 3
फोडणीत लाल तिखट घालावे.लगेच डाळ ओतावी म्हणजे खाट उठत नाही.
- 4
नंतर हवे असेल तेवढे गरम पाणी घालावे. आमसूल, गूळ,मीठ, कोथिंबीर घालावी.आमटी मंद गॅस वर उकळू द्यावी.आमटी पातळच चांगली लागते.
- 5
गरमागरम आमटी तयार आहे भाता बरोबर छान लागते. आवडत असल्यास ओले खोबरे घालावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16754752










टिप्पण्या