प्रोटिनयुक्त हेल्दी सोया व्हेजि बिर्याणी (Soya Veg Biryani Recipe In Marathi)

#RR2 लहान मोठ्यांसाठी पौष्टिक अशी ही व्हेज बिर्याणी.
प्रोटिनयुक्त हेल्दी सोया व्हेजि बिर्याणी (Soya Veg Biryani Recipe In Marathi)
#RR2 लहान मोठ्यांसाठी पौष्टिक अशी ही व्हेज बिर्याणी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून त्यात १ कप सोया चंक २० मिनिटे ठेवा. जेणेकरून ते चांगले फुगतील.नंतर सोया चंक हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका.
- 2
आता एका पसरट ताटात हे सोया पसरवून ठेवा. दुसऱ्या बाजूला गाजर, सिमला मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे मध्यम आकाराचे काप करून एका पॅन मध्ये गॅस च्या मध्यम आचेवर भाजून घ्या. आता सोया चंक मध्ये वरील गाजर, सिमला मिरची चे तुकडे घालून वरून पाव कप दही, आले लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला, गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आणि १० मिनिटे मॅरिनेट करायला ठेवून द्या.
- 3
बाजूला गॅस चालू करून एका भांड्यात पाणी गरम करून त्यात २ चमचे तूप,१ वेलची,१ लवंग,पाव लिंबू काप, जीरे, बारीक चिरलेली कोथिंबीर १५ मिनिटे भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ घाला.आणि तो शिजवून घ्या.
- 4
दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून एका कढई पॅन मध्ये थोडे तेल गरम करून त्यात तमालपत्र, वेलची, जीरे, घालून २ बारीक चिरलेला कांदा, ३ बारीक चिरलेला टोमॅटो तेलात चांगला परतवून ते नरम पडले की त्यात मॅरिनेट केलेले सोया, सिमला, गाजर, कांदयात परतवून घ्या. नंतर वरून थोडे लाल तिखट, गरम मसाला चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजू दया. नंतर थोडे पाणी घालून मिश्रण चांगले शिजू दया. आता थोडी ग्रेव्ही बाजूला काढून वरून शिजलेला भात घालून पुन्हा वरून ग्रेव्ही घालून बारीक चिरलेली
- 5
कोथिंबीर घालून गरमागरम रायत्या सोबत सव्हऀ करा.
Similar Recipes
More Recipes








टिप्पण्या