#डाळखिचडी कढी

#डाळखिचडी कढी
कुकिंग सूचना
- 1
मुगडाळ तांदुळ१० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा नंतर परत स्वच्छ धुवुन त्यात हळद, मिठ, हिंग, पाणी घालून कुकरमधुन४ शिट्टया शिजवुन घ्या कढईत तेल व साजुक तुप गरम करून त्यात मोहरी, जिरे, ठेचलेला लसुण, लालमिरच्यांची फोडणी करा
- 2
फोडणीत शिजवलेना मुगभात घालुन परता आवश्यकते प्रमाणे गरमपाणी, मिठ, गरम मसाला घालुन शिजवा आपली डाळ खिचडी रेडी
- 3
बाऊलमध्ये दही घेऊन फेटुन घ्या त्यातच चण्याचे पिठ व गरमपाणी मिक्स करा नंतर त्यात हळद, हिंग मिक्स करून फेटुन घ्या फोडणीचे साहित्य काढुन ठेवा
- 4
मसाल्याचा डबा रेडी ठेवा पातेल्यात साजुक तुप गरम करा त्यात मोहरी, जिरे, ठेचलेला लसुण, कडिपत्ता, मिरच्या परतुन दह्याचे बॅटर ओतुन स्लो गॅसवर उकळी काढा चविनुसार साखर मिक्स करा गॅस बंद करून नंतर चविनुसार मिठ मिक्स करा(कढी फुटु नये म्हणुन मिठ शेवटी घाला)
- 5
प्लेटमध्ये गरमागरम डाळखिचडी व सोबत आंबट गोड कढी व लिंबाची फोड देऊन डिश सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या