कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मटण धुवून घ्या
- 2
मग कुकर मध्ये मटण शिजवून घ्या मटनात चरबी असेल तर फोडणीच्या वेळेस घाला शिजवू नका
- 3
हिरवी पेस्ट बनवून कोथिंबीर,आलं,लसूण पाणी घालू नका
गरम मसाला बनवून घ्या सर्व अक्खा मसाला धने आणि जिरे भाजून घ्या मग त्याची पावडर बनवून घ्या - 4
टोपात तेल तापवून घ्या त्यात चरबीअखे लसूण टाकून परतवून घ्या
- 5
कांदे घाला व परतवून घ्या
- 6
कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत परतवून घ्या मग बेडगी मिरची घाला
- 7
मग १ ते २ मिनिटे परतवून घ्या
आता वाटलेलं हिरवी पेस्ट आणि गरम मसाला घाला व एकजीव करून घ्या - 8
मसाल्याचे तिखट वास जाईपर्यंत चांगलं परतवून घ्या
आता सर्व सुखे मसाले घाला व चांगलं परतवून घ्या मसाल्यांना तेल सुटे पर्यंत भाजून घ्या
आता शिजवून घेतलेले मटण व मटणाचे पाणी घाला व सर्व एकजीव करून घ्या - 9
मसाला आणि मटण एकजीव होईपर्यंत उकळी काढा व पाणी थोडंस आटू द्या
- 10
मग गरमागरम मटण तयार आहे... अकख्या लसनाच्या आतला घर खायचा आहे चवीला खूप छान लागतो
- 11
हे मटण आपण चपाती, भाकरी,भात, आंबोळी सोबत खाऊ शकतो
Similar Recipes
More Recipes








टिप्पण्या