कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)

#बिर्याणी
माहेर समुद्र किनारी म्हणून पक्की मासेखाऊ मी! मग माश्यांच्या विविध रेसिपी बनवणं तर ओघाने आलेच. लॉकडाऊन ३ नंतर हळूहळू मासे मिळायला सुरुवात झाली आणि मग जेव्हा बऱ्यापैकी मासळी मिळू लागली तेव्हा एकदाचा हा बिर्याणीचा बेत केलाच. त्या आधी मात्र बरेच दिवस चिकन बिर्याणी वर समाधान मानावे लागले होते.
चिकन दम बिर्याणी सारखीच ही सुद्धा बिर्याणी बनवली आणि मग मी दमले हो कारण याबरोबरच पापलेट चे तीखले भाकऱ्या ही केल्या. मग घरात सगळ्यांना दम देऊन सगळे खायला ही घातलं 😄😄 आणि आता दमून भागून बिर्याणीची रेसिपी पोस्ट करतेय.

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दोन मोठे कांदे उभे बारीक चिरून कढईत तेलात कुरकुरीत तळून घ्या. हे बाजूला ठेवा.
- 2
उरलेला एक कांदा बारीक चिरून घ्या, टोमॅटो बारीक चिरा. बटाट्याच्या फोडी करून घ्या. कोळंबी स्वच्छ धुवून घ्या. आले लसूण मिरची कोथिंबीर ठेचून घ्या.
- 3
आता कढईतले तेल काढून फक्त 2 टेबलस्पून तेल ठेवा. ह्या तेलात आख्खा गरम मसाला, आले लसूण मिरचीचा ठेचा(वाटण करू शकता, पण मला ठेचलेला आवडतो म्हणून मी तसाच घातला.) घाला आणि चांगले तळून घ्या.
- 4
कढईत कांदा घालून लालसर तळून घ्या. त्यांनतर टोमॅटो आणि बटाट्याच्या फोडी घाला. सर्वात शेवटी कोळंबी घालून ५ मिनिटे परतून घ्या.
- 5
आता लाल तिखट, हळद, मीठ, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला पावडर घालून मिक्स करा. ५ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.
- 6
साधारण शिजल्यावर त्यात दही आणि क्रीम घालून परतून घ्या आणि गॅस बंद करा.
- 7
एका बाजूला भांड्यात तांदूळ १५ मिनिटे भिजत ठेवा आणि अर्धा कच्चा (70%) शिजवून घ्या. अर्धवट शिजलेला भात एका चाळणीत उपसून घ्या.
- 8
एका मोठ्या भांड्यात आता बिर्याणीचे थर लावू. सर्वात आधी कोळंबी भाजी छा एक थर मग राईस मग थोडा तळलेला कांदा, पुन्हा कोळंबी भाजी, त्यावर राईस आणि वर तळलेला कांदा व कोथींबीर घाला.
- 9
या लावलेल्या थरांवर एका वाटीत २ चमचे दुधात भिजवलेले केसर घाला आणि वरून साजूक तूप कडेने सोडा.
- 10
भांड्यावर जड तवा ठेवून भांडे गॅस वर ठेवा, ५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या. मग गॅस तवा ठेवून त्यावर हे भांडे झाकून ठेवा. आणि आणखी थोडावेळ indirect heat वर शिजू द्या.
- 11
गरमा गरम बिर्याणी सलाड, आणि फिश करी बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या