चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
Navi mumbai

#बिर्याणी कधीकधी बिर्याणी करणा खूप किचकट वाटतात चिकन मॅरीनेट करा तांदूळ वेगळे शिजवुन घ्या पुन्हा एकत्र करून द्या त्यांना एकत्र मिक्स करून दम द्या... आपल्याकडे खूप वेळ नसेल तर या प्रकारची बिर्याणी आपण बनवू शकतो..

चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

#बिर्याणी कधीकधी बिर्याणी करणा खूप किचकट वाटतात चिकन मॅरीनेट करा तांदूळ वेगळे शिजवुन घ्या पुन्हा एकत्र करून द्या त्यांना एकत्र मिक्स करून दम द्या... आपल्याकडे खूप वेळ नसेल तर या प्रकारची बिर्याणी आपण बनवू शकतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोचिकन
  2. 1/2 किलोबासमती तांदूळ
  3. 4मोठे कांदे
  4. 2 चमचेअद्रक लसणाची पेस्ट
  5. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 1 चमचालाल तिखट
  8. 1 चमचागरम मसाला
  9. 1/4 चमचाहळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 चमचाधने-जिरे पावडर
  12. अख्खा गरम मसाला
  13. 2तेज पत्र
  14. 1स्टारफुल
  15. 5/6लवंग
  16. 5/6काळी मिरी
  17. 2/3हिरवी वेलची
  18. 1मसाल्याची वेलची
  19. 1 तुकडादालचिनी

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    चिकन स्वच्छ धुवुन त्याला आले लसून पेस्ट आणि मीठ लावून अर्धा तास ठेवून द्यावे...तांदूळ स्वच्छ धुऊन पंधरा मिनिटे भिजत ठेवावे त्यानंतर त्यातील पाणी निथळून घ्यावे...2 कांदे उभे चिरून तव्यावर लालसर भाजून नंतर त्यात खोबरे टाकून व्यवस्थित भाजून घ्यावे..आता कांदा खोबऱ्याचे मिश्रण चार-पाच लसूण अद्रक व हिरवी मिरची थोडी कोथिंबीर टाकून मिक्सरवर वाटून घ्यावे...

  2. 2

    गॅस वर कुकर मध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून त्यावर अख्खा गरम मसाला टाका नंतर त्यात चिरलेला कांदा परतावा गुलाबी होईपर्यंत नंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकावी चिरलेला टोमॅटो टाकावा व चांगले एकजीव होईपर्यंत परतावे मसाल्याला तेल सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला व वाटलेलं वाटण घालून मसाला व्यवस्थित परतावा अगदी तेल सुटेपर्यंत आता त्यात चिकन टाकून आणखी थोडा वेळ परतावे...चार ते पाच मिनिट चिकन मसाल्यामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकावा..

  3. 3

    आता मध्ये तीन ग्लास पाणी टाकून व चवीनुसार मीठ टाकून कुकरचे झाकण बंद करावे व तीन शिट्या करून बिर्याणी शिजवून घ्यावे आपली चिकन बिर्याणी तयार आहे... कांदा, लिंबू व कोशिंबिरी सह सर्व्ह करावी चिकन बिर्याणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
रोजी
Navi mumbai
The makeup artist
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes