कांदे पोहे आणि दही (pohe ani dahi recipe in marathi)

पोहे...नाव एक आणि बनवले जातात किती तरी प्रकारे... अगदी लहानपणी आत्या मामा कडे गावी गेल्यावर खाल्लेले लाल तिखट मीठाची फोडणी टाकलेले एकदम साधे पण तेवढेच चविष्ट पोहे किंवा आईच्या हातचे कांदे पोहे आणि वरून भूरभूरलेली मोडाची मटकी आणि बारामती येथे बायोटेक canteen ला खाल्लेले सांबार पोहे...सगळेच प्रकार भन्नाट... आणि त्यातल्या त्यात माझी आवडती डीश म्हणजे कांदे पोहे आणि दही... चला बघूया रेसिपी.

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गॅस वर कढई चढवून त्यात तेल गरम करून घ्या. गरम तेलात शेंगदाणे तळून घ्या आणि बाजूला ठेवून द्गया. मग त्याच तेलात मोहरी जीरे चांगले तडतडली की मग कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या बटाटा चांगल्या प्रकारे परतून घ्या.
- 2
कांदे मिरच्या परतून होईपर्यंत जाड पोहे चाळून आणि वाहत्या पाण्यात धुवून घ्या. मग फोडणी मध्ये हळद घालून परतून घ्या. त्यात भिजवून ठेवलेले पोहे घालून परतून घ्या. पोहे परतत आले की त्यात मीठ चवीनुसार, साखर आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित हलवा
- 3
पोहे २ मिनिटे मंद आचेवर कढई वर झाकण ठेवून वाफवून घ्या. मग तयार पोहे डीश मध्ये काढून त्यावर आपल्या आवडीनुसार दही, बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळून घेतलेले शेंगदाणे घालून सर्व करा. Enjoy and stay healthy 😊🙏
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या