आचारी भरवॉं प्याज (aachari bharava pyaj recipe in marathi)

#स्टफ्ड मी नेहमीच झटपट होणा-या आणि चवीला चटपटीत असणाऱ्या रेसिपींच्या शोधात असते... अशीच शोधमोहीम सुरू असताना मला हि एक राजस्थानी रेसिपी सापडली... राजस्थान हे एक सुंदर राज्य आहे आणि तिथल्या जनतेने हि सुंदरता त्यांच्या लोककला, पेहराव, आदरातिथ्य, पाककला इत्यादिंद्वारे आणखी समृद्ध केली आहे.. त्यांच्या अनेक चविष्ट पदार्थांपैकी हि रेसिपी मला करून पाहाविशी वाटली.. आणि ती अप्रतीम झाली... तुम्हीपण करून पाहा

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कांद्याची दोन्ही टोके चिरून त्यांची साल काढून स्वच्छ धुवून घ्या. मग त्यांना भरली वांगी करताना वांगी जशी चिरून घेतात त्याप्रमाणे चिरून घ्या. मसाल्याची तयारी करुन घ्या.
- 2
मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, धने पूड, अद्रक लसूण पेस्ट, लिंबाचा रस, बडिशेप पूड हे सर्व एकजीव करून त्याची पेस्ट बनवून घ्या. ती पेस्ट चिरलेल्या कांद्यात भरा.
- 3
कढई मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतावे. नंतर त्यात कांदे अलगद ठेवावेत. उरलेल्या मसाल्यात १/२ कप पाणी घालून ते फोडणी मध्ये टाकावे. कढईचे झाकण लावून ३ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. ३ मिनीटांनी झाकण काढून कांदे पलटून दुसऱ्या बाजूने ३ मिनीटांसाठी कढईचे झाकण लावून शिजू द्यावे. ३ मिनिटे झाल्यावर गॅस बंद करावा आणि झटपट झणझणीत आचारी भरवॉं प्याज सर्व्ह करावे. Enjoy and stay healthy 😊🙏
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)