स्टफ्ड वडा पाव आणि स्टफ्ड ब्रेड रोल(stuff vada pav aani stuff bread roll recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#स्टफ्ड ...काय स्टफ्ड भजी बनवू विचार करत होती .. भाज्या तर आपण भरेलेले खातोच...कारली ,भेंडी,वांगी,. आज विचार केले स्टफ्ड वडा पाव बनवू...त्यात ब्रेड पण होते घरी म्हणून स्टफ्ड ब्रेड रोल पण बनवले ..खूप छान झाले. .तुम्ही पण बनवून बघा..

स्टफ्ड वडा पाव आणि स्टफ्ड ब्रेड रोल(stuff vada pav aani stuff bread roll recipe in marathi)

#स्टफ्ड ...काय स्टफ्ड भजी बनवू विचार करत होती .. भाज्या तर आपण भरेलेले खातोच...कारली ,भेंडी,वांगी,. आज विचार केले स्टफ्ड वडा पाव बनवू...त्यात ब्रेड पण होते घरी म्हणून स्टफ्ड ब्रेड रोल पण बनवले ..खूप छान झाले. .तुम्ही पण बनवून बघा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

स्टफ्ड वडा पाव १ तास ब्रेड रोल १/२ तास
  1. स्टफ्ड वडा पाव साठी
  2. 2 कपमैदा
  3. 1/2 कपदही
  4. 1/2 चमचाबेकिंग पावडर
  5. ब्रेड रोल साठी
  6. स्टफ्फिन
  7. ५/६बटाटा
  8. 1/2 चमचाएनो
  9. 2 चमचेआले लसूण पेस्ट
  10. 1 चमचावाटलेले मिरची हिरवी
  11. 1/2 चमचाराई /जिरा
  12. ३/४कडीपत्ता
  13. 1 चमचाहळद
  14. चवीनुसारमीठ
  15. तेल
  16. ब्रेड रोल साठी
  17. 3/4ब्रेड स्लाइस
  18. 1कप बटाटा भजी

कुकिंग सूचना

स्टफ्ड वडा पाव १ तास ब्रेड रोल १/२ तास
  1. 1

    मैदा घ्या..त्या मध्ये दही इनो आणि बकिंग पावडर घालून चपाती ला मळतो तसे मळून घ्या.

  2. 2

    ते मलेला गोळा रेस्ट करायला ठेवा १० मिनिट साठी...आता स्टफ्फिंग करायला घेऊ..बटाटे शिजवून घ्या...एक टोप घ्या..त्या मध्ये तेल टाका..आणि राई जीरा कडीपत्ता घाला...ते तडतडले की आले लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि हळद घालून मिक्स करा..

  3. 3

    तो मसाला शिजलेल्या बटाटा मध्ये घाला..आणि चांगले मिक्स करा..

  4. 4

    आता पिठाचा गोळा घ्या. आणि परत एकदा त्याला चांगला मळून घ्या. आणि चपाती करतो तसे लाटून घ्या. आणि एका बाजूला भाजी ठेवा. आणि त्याच्या साईड ला पाणी लावा... म्हणजे ते साईड चीकटेल..

  5. 5

    भाजी ठेवली तिकडे पाणी लावून चपाती फोल्ड करा...आणि दुसऱ्या बाजूला कापणी ने कट मारा...जसे फोटो मध्ये दाखवेल आहे तसेच सेम करा..

  6. 6

    आता एका बेकिंग ट्रे ला तेल.लावून त्या वर ते रोल ठेवा...आणि कुकर या कढई मध्ये ठेवा...३०/३५ मिनिट झाकून ठेवा..झाले आपले स्टफ्ड वडा पाव...

  7. 7

    आता ब्रेड चे स्लाइस घ्या...त्याचे साईड कट करून त्याला पाणी लावा..साईड ला...मग त्याच्या मध्ये बटाटा भाजी भरून रोल करा...सगळ्या बाजूने चिकटले पाहिजे.मग एका कढई मध्ये तेल घ्या. तेल गरम झाले की रोल त्या मध्ये सोडा..आणि गोल्डन ब्राऊन होऊ पर्यंत तळा...झाले आपले स्टफ्ड ब्रेड रोल तयार..

  8. 8

    रोल चांगले तळून घ्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

Similar Recipes