सुशिला (sushila recipe in marathi)

हा पदार्थ वगरानी, गिरमीट, सुसला इ.अनेक नावांनी ओळखला जातो..हा पदार्थ कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या गावांमध्ये आणि मराठवाड्यात फेमस आहे. करण्यास एकदम सोप्पा आणि चविष्ट आणि पचायला हलका असा हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे करता येतो...मी कसा केला हे पहा आणि तुम्हीपण करून पाहा..

कुकिंग सूचना
- 1
कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्या.
- 2
कांदा परतून होईपर्यंत मुरमुरे पाण्यातून निथळून घ्यावेत. निथळून घेतलेले मुरमुरे आता फोडणी मध्ये घालावेत आणि मिक्स करून घ्यावेत.
- 3
त्यानंतर शेंगदाण्याचे कूट आणि चवीनुसार मीठ घालून परत एकदा नीट मिक्स करून घ्यावे. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर २ मिनिटे शिजू द्यावे.
- 4
२ मिनीटांनी गॅस बंद करून गरमागरम सुशिला लिंबू पिळून बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभूरून सर्व करावे. Enjoy and stay healthy 😊🙏
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)