झणझणीत डाळ भाजी(dal bhaaji recipe in marathi)

#रेसीपी बूक गावा कड ची आठवणडाळ भाजी ही जास्त करून महाप्रसाद बनवितात त्यात बनवली जाते.. मसालेभात, भाकरी आणि पोळी बरोबर छान लागते.. ही पण गावा अडली डिश
झणझणीत डाळ भाजी(dal bhaaji recipe in marathi)
#रेसीपी बूक गावा कड ची आठवणडाळ भाजी ही जास्त करून महाप्रसाद बनवितात त्यात बनवली जाते.. मसालेभात, भाकरी आणि पोळी बरोबर छान लागते.. ही पण गावा अडली डिश
कुकिंग सूचना
- 1
पहिले पालक व टोमॅटो धुवून बारीक चिरून घ्यावे.
- 2
नंतर कुकर च्या भांड्यात सगळ्या डाळी धुवून टाकाव्या. मग पालक टाकावा.. कुकर मध्ये शिकतानाच हळद, धणे पूड आणि गरम मसाला टाकावा... कुकर 2 शिट्ट्या तेज आचेवर आणि 1 शिट्टी मंद आचेवर घेऊन गॅस बंद करावा.. मग गॅस वर कढई ठेऊन त्यात तेल, मोहोरी, हिंग, जिरे, तेज पान, घालावा.. मग लसूण घालावा.. लसूण तांबूस झाला की टोमॅटो घालावे.. टोमॅटोला तेल सुटले की त्यात 2 चमचे बेसन घालावे.. व मस्त परतवून घ्यावे.. नंतर त्यात शिजलेली डाळ भाजी घालावी.. चवी प्रमाणे मीठ व साखर घालावी... भाजी मस्त उकळून द्यावी...
- 3
मग वरुन तिखट लसूण आणि लाल मिरच्या टाकून वरुण फोडणी टाकावी.. झाली डिश रेडी....
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या