सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi)

Kalpana Pawar @Cook_20551026
#goldanapron3 #week 23#सोयाबीन
कुकिंग सूचना
- 1
बासमती तांदूळ चार-पाच तास भिजत ठेवून सर्व साहित्य एका डिश मध्ये काढून घेतले व कांदे कापून खरपूस लाल तळून घेतले.
- 2
दोन चमचे तूप घालून त्यात लवंग दालचिनी टाकून भात पाणी घालून शिजवून घेतला व चाळणीत काढून पाणी निथळून घेतले.
- 3
सोया चंक्स चार-पाच तास पाण्यात भिजवून निथळून घेतलेले तेलात तळून त्यावर लाल मिरची चाट मसाला काळे मीठ पसरवून घेतले थोडा वेळ बाजूला ठेवून तेलात सर्व मसाले टाकून फोडणी तयार करून घेतले व त्यात पाणी घालून सोयाबीन शिजवून घेतले.
- 4
एका बाऊलमध्ये थोडा भात काढून त्याच्यावर सोयाची फोडणी दिलेली ग्रेव्ही घालावी वरून तळलेला कांदा पून्हा भात पून्हा ग्रेव्ही असे २-३ लेयर देऊन वरून गाजर किस पसरवून घ्यावे.
- 5
तळलेले सोयाबीन फ्राईड पोटॅटो कोथिंबीर गाजराचा कीस घालून गार्निश करून सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13143646


















टिप्पण्या