अरबीची भाजी (arbichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अरबी स्वच्छ धुऊन उकडून घ्यावी. काप करून घ्यावेत.
- 2
अरबीच्या कापांमध्ये लाल तिखट, आमचूर पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. १ टीस्पून तेलात तळून घ्यावेत.
- 3
एका मिक्सर च्या भांड्यात ओलं खोबरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात लाल तिखट, आमचूर पावडर, गरम मसाला, धणे जीरे पूड आणि हळद घालावी. त्यात वाटलेले मिश्रण घालून चांगले भाजून घ्यावे.
- 4
थोडे पाणी घालावे. उकळी आली की त्यात तळलेले अरबीचे काप घालावेत. ४-५ मिनीटे शिजवावे.
- 5
वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13312948

















टिप्पण्या