मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9
#Themeफ्युजनरेसिपी
महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा.
मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9
#Themeफ्युजनरेसिपी
महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम बटाटे उकडवून घ्या. आणि बारीक कापून घ्या. आता कढईमध्ये तेल टाका. नंतर त्यामध्ये मोहरी,जिरे यांची फोडणी द्या. नंतर त्यात कांदा, कढीपत्ता हिरव्या मिरचीचे चटणी,हळद, धने पावडर घालून परतून घ्या.
- 2
आता त्यात उकडलेले बटाटे टाका. आणि वरून कोथिंबीर टाका.छान मिक्स करून घ्या.तयार आहे आपली स्टफिंग.
- 3
आता एक बोल मध्ये बेसन पीठ घेऊ. नंतर त्यात लाल मिरची पावडर,मीठ घालू. गरजेनुसार पाणी घालून मीडियम बॅटर तयार करून घेऊ.नंतर त्यात एक चमचा गरम तेल टाकून मिक्स करून घेऊ.
- 4
आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. आता आपण बटाट्याचे वडे बनवून घेऊ.नंतर ते बेसन पिठामध्ये घोळवून गरम गरम तेलात छान मस्तपैकी तळून घेऊ.
- 5
आता पाव घेऊन त्याला मधुन चिरून घेऊ. नंतर त्याला सालसा चटणी लावून घेऊ. नंतर त्यावर तयार वडा ठेवा. आता त्यावर चिरलेला कांदा,चिरलेला टोमॅटो घाला. नंतर त्यावर थोडा पावभाजी मसाला टाका.
- 6
आता त्यावर चीज किसुन टाका. आता पाव बंद करून, त्यावर बटर लावा. नंतर टोस्टरमध्ये रोस्ट करून घ्या.
- 7
तयार आहे आपले टेस्टी,वडापाव सँडविच वडापाव तर आपण नेहमी खातो परंतु त्यामध्ये चीज,सालसा सॉस घालून त्याचे सँडविच बनवून एक वेगळी टेस्ट त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या (3)