पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)

#GA4
Week -1
भारताच्या सर्व चे प्रांतात म्हणजे अगदी भारतातल्या पूर्व, पश्चिम आमी उत्तरे कडील पंजाब येथे आलू पराठा हा नास्ता मधे बहुतेक केला जाणारा पदार्थ.
आलू पराठा मध्ये गव्हाचे पीठ ,मैदा ह्याचे पीठ भिजवून त्यात बटाट्याच्ये मीश्रण भरुन तेल किंवा तूप वर तो पराठा भाजून दही किंवा लोणच्या बरोबर नास्त्यात दिला जातो.
काही वर्षांपूर्वी आमचा सिमला मनाली टूर करण्याचा योग आला व सिमल्याहून मनाली कडे जाताना रस्त्यात एक होटेल मध्ये तेथे आलू पराठा खाण्याचा योग आला मला तो आलू पराठा एवढा आवडला की मी तीथे त्यांच्या कडून रेसिपी लिहून घेतली होती आणि तेव्हा पासून घरी पण तसेच आलू पराठे बनवून घरच्या मंडळींना खाऊ घालते.
तुम्ही पण नक्की करुन बघा तुम्हाला देखील नक्की च आवडेल.

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम उकडून सोलून घेतलेले बटाटे कुस्करून घ्या व त्यात बारीक चिरलेला कांदा,लाल मिरची पावडर, हळद,गरम मसाला, पावभाजी मसाला,जीरे पावडर,चाट मसाला, आलं-लसूण पेस्ट व मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र घ्या.
- 2
आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व एकत्र करून घ्या.पराठ्याचे स्टफिंग तयार आहे.
- 3
पराठ्या साठी एका बाउल मध्ये गव्हाचे पीठ,मैदा,हळद,दोन टेबलस्पून तेल व मीठ घालून त्यात थोडे थोडे पाणी घालून पराठ्या साठी कणीक भिजवून घ्या
- 4
भिजलेल्या पीठातील छोटा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करा व त्यात तयार केलेले बटाट्याचे स्टफिंग भरून वाटी बंद करुन घ्या.
- 5
आता पोळपाटावर थोडे कोरड्या पीठाचे डस्टीग करून पराठा लाटून घ्या व थोडे तेल किंवा तूप घालून व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्या.
- 6
तयार झालेला आलू पराठा दही, किंवा लोणच्या बरोबर सर्व्ह करा.कांदा व मिरची पण सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)