नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)

Sandhya Chimurkar @sandhya1234
नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.मग एका परातीत बेसन आणि मैदा घ्या. तेल कडकडीत गरम करून मोहन घालावे.आणि छान मिक्स करून घ्यावे. मग त्यात हळद तिखट मीठ टाका.थोड थोड पाणी घालून गोळा तयार करावा.
- 2
मग एका कढई मध्ये तेल टाकून त्यात जिर आणि खसखस टाका. बारीक चिरलेली मिरची टाका मग कोथिंबीर टाकून 2-3 मिनिट शिजू द्यावे.
- 3
मग हळद तिखट मीठ घालून मिक्स करावे आणि खोबरकिस आणि शेंगदाणा कूट टाकावा. आणि मिक्स करून घ्यावे.
- 4
वरून तीळ टाकून सारण तयार. मग मळून ठेवलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
- 5
आणि पारी लाटून घ्यावी. थोड साईड नी कापून घ्यावे मग चमचा नी सारण पारी वर ठेऊन पॅक करावी.
- 6
अश्या प्रकारे सर्व वड्या तयार करून घ्यावे.
- 7
मग एका कढई मध्ये तेल टाकून त्यात सर्व वड्या तळून घ्यावेत.
- 8
आणि तयार गरमा गरम कोथिंबीर वडी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- स्ट्राॅबेरी फ्लेवर काजू बदाम मिल्कशेक (strawberry kaju badam milkshake recipe in marathi)
- ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
- दही वाले आलू (potato with curd gravy recipe in marathi)
- हिरवी मिरची चटणी (green mirchi chutney recipe in marathi)
- पीनट चाॅकलेट मोदक विथ गुलकंद स्टफींग (chocolate modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13813666

























टिप्पण्या