ज्वारीचे पौष्टिक थालिपीठ (jowariche paushtik thalipeeth recipe in marathi)

#GA4 #WEEK16 #KeywordJowar
थंडी आली की आपल्याला चमचमीत आणि गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. पण हे पदार्थ जीभेसाठी जरी चविष्ट असले तरी आपल्या पोटासाठी मात्र घातक ठरतात. म्हणूनच काहीसे डाएट सांभाळत गरमागरम व खमंग थालिपीठचा आस्वाद घेणे म्हणजे पर्वणीच!
यासाठी घेऊन आले आहे, ज्वारीच्या पिठाचे खमंग चविष्ट व पौष्टिक थालिपीठ. बनवण्यास अत्यंत सोपे, कमी वेळात तयार होणारे व घरातील सर्वांना खावेसे वाटणारे ज्वारीचे थालिपीठ.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम लसूण व मिरच्या कुटून वाटण तयार करावे. तयार झालेले वाटण एका परातीत काढून त्यात ज्वारीचे पीठ, बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, ओवा व चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- 2
संपूर्ण मिश्रण पाण्याच्या सहायाने मळून घ्यावे व गोळा तयार करावा.
- 3
ह्यानंतर एका तव्यावर दोन टी- स्पून तेल घालून छोटा गोळा तव्यावर थापावा. थालिपीठ थापून झाल्यानंतर पांढरे तीळ वर घालावे. थालिपीठाच्या मध्यभागी व ४ बाजूंना छोटे छिद्र करावे. ह्या छिद्रांमध्ये थोडे तेल घालावे.
- 4
मंद आचेवर तवा ठेवून थालिपीठावर झाकण ठेवावे.
- 5
अंदाजे ४-५ मिनिटांनंतर थालिपीठ उलटावे. थालिपीठ उलटल्यानंतर छिद्रांमध्ये पुन्हा थोडे तेल घालून थालिपीठ पूर्ण अंदाजे २-३ मिनिटे शिजू द्यावे
- 6
आपले गरमागरम, खमंग व चविष्ट थालिपीठ तयार आहे!
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)