पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)

#dfr
दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळे साहित्य हाताशी घ्यावे..
- 2
आता एक जाड बेस चे पॅन घ्यावे त्यात २ टेबलस्पून तूप घेऊन ते थोड मेल्ट झालं की त्यात प्रथम रवा घालून छान परतून घ्यावा..रव्याचा कच्चा वास निघून जाईल येवढे परतावे..रवा ब्राऊन होईल येवढे परतू नये..छान वास यायला लागला की रवा एक प्लेट मध्ये काढून घ्यावा..
- 3
आता त्याच पॅन मधे उरलेले तूप घेऊन ते गरम झाले की त्यात बेसन घेऊन ते चांगले २०-२५ मिन मध्यम आचेवर परतत राहावे..मध्यम आच हे लक्षात ठेवावे..आणि सतत परतत राहावे.. बेसनाचा मुळ रंग बदलला पाहिजे..थोडा ब्राऊनिश कलर आला की गॅस बंद करावा..खूप जास्त डार्क पण करू नये..तुपात बेसन टाकल्या टाकल्या कोरड वाटेल बट जस जसे परतत राहू तसे तूप आणि बेसन पातळ होईल.. पिठल्याप्रमाने दिसायला लागेल..तसेच दिसायला हवे..
- 4
आता गॅस बंद करून त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करून पॅन साइडला ठेवून द्यावे..
- 5
आता एका पातेल्यात साखर घेऊन ती बुडेल इतपत पाणी टाकून मध्यम आचेवर उकळत ठेवावे. मी गोल्डन शुगर वापरली आहे त्यामुळे फोटोत ब्राऊन कलर दिसत आहे..तुम्ही कोणतीही वापरू शकता. त्यात वेलची पूड घालावी..बॉयलिंग स्टेज ला आल्यावर ५ मिन मध्ये एक तारी पाक होतो..प्लेट मध्ये एक ड्रॉप घेऊन चेक करावा थोडा चिकट लागत असेल तर पटकन गॅस बंद करून हा पाक बेसन रव्याचा मिश्रणात टाकावा..मिश्रण पातळ वाटेल बट मुरल्यावर छान मिळून येते.. १ तास मिश्रण झाकून पाक मुरण्यासाठी ठेवून द्यावा..
- 6
मिश्रण घट्ट झाले की मग याचे हवे त्या आकारात लाडू वळून त्यावर सुका मेवा लावून सजवून ठेवावे..सुपर सॉफ्ट पाकातले रवा बेसन लाडू खाण्यासाठी तयार.😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या