मल्टीग्रेन दलिया (multigrain daliya recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#tmr
30 मिनिट्स रेसिपी . यासाठी मी पौष्टिक दलिया वापरला आहे.
यात गहू,तांदूळ, नाचणी,हिरवे मूग, बाजरी,तीळ, ओवा हे घटक आहेत.
पोटभर नाष्टा, कमी वेळात होणारा ही आहे.

मल्टीग्रेन दलिया (multigrain daliya recipe in marathi)

#tmr
30 मिनिट्स रेसिपी . यासाठी मी पौष्टिक दलिया वापरला आहे.
यात गहू,तांदूळ, नाचणी,हिरवे मूग, बाजरी,तीळ, ओवा हे घटक आहेत.
पोटभर नाष्टा, कमी वेळात होणारा ही आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे.
2-3 जणांसाठी
  1. 1 कपमल्टीग्रेन दलिया
  2. 1/2लाल टोमॅटो
  3. 1 लहानकांदा
  4. 1 लहानसिमला मिरची
  5. 1 लहानगाजर
  6. आवडत असल्यास इतर ही भाज्या तुम्ही घालू शकता
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. 1 टीस्पूनआलं-लसूण पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1.2 टीस्पूनलाल तिखट
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. थोडी कोथिंबीर
  13. लिंबू

कुकिंग सूचना

30 मिनिटे.
  1. 1

    गॅसवर कढई तापत ठेवा. त्यात मल्टीग्रेन दलिया घालून मंद आचेवर 5 मिनिटे भाजून घ्यावा. ताटलीत काढून घेणे.कांदा, टोमॅटो, सिमला मिरची,कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घेणे. गाजर किसून घेणे.

  2. 2

    गॅसवर छोटा कूकर तापत ठेवणे. त्यात तेल, जीरे, मोहरी घाला. कांदा घालून थोडा लालसर परतून घेणे. मग टोमॅटो दोन-तीन मिनिटं परतून घेणे.

  3. 3

    चिरलेल्या भाज्या घालून दोन-तीन मिनिटे परतवून घेणे. लाल तिखट व हळद घालून मिक्स करून घेणे व भाजलेला दलिया घालून घेणे.

  4. 4

    चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. दीड-दोन कप गरम पाणी घालून घेणे. कुकरला झाकण लावून तीन-चार शिट्टया करून घेणे व गॅस बंद करणे.

  5. 5

    कुकर थोडा थंड झाल्यावर, गरमागरम दलिया खाण्यासाठी देणे.वरुन कोथिंबीर घालावी व लिंबू पिळून घेणे. गरमागरम मल्टीग्रेन दलिया खाण्यासाठी तयार. खूप छान लागतो. वेटलाॅस साठी ही उपयुक्त.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes