कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)

कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कचोरी चा मसाला तयार करण्यासाठी मुंग डाळ स्वच्छ धुवून तीन तास पाण्यामध्ये भिजवून घ्या भिजून झाल्यावर एक कढई गरम करा त्यामध्ये तेल, जीरे,बडीशोप, हिरवी मिरची अद्रक पेस्ट याची फोडणी तयार करा त्यानंतर हिंग, हळद आणि मोगर डाळ त्यामध्ये टाका भिजवताना जे पाणी असेल त्याचाच वापर करून डाळ शिजवून घ्या.
- 2
डाळ शिजवून झाल्यावर मोकळी दिसेल त्या मध्ये बेसन पीठ टाकून घ्या व्यवस्थित मिक्स करा त्यानंतर सर्व मसाले,तीळ, मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर,लिंबूरस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मसाला हा व्यवस्थित थंड होऊ द्या
- 3
त्यानंतर मैद्याचे कणिक बांधण्यासाठी मोहन मीठ घालून व्यवस्थित मीडियम कणिक बांधून घ्या. तयार केलेल्या मसाल्याचे लहान गोळे तयार करून घ्या लहान मैद्याच्या कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये तयार केलेला मसाल्याचा गोळा ठेवून व्यवस्थित वरून पॅक करून घ्या. एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर तयार केलेले मिनी कचोरी बॉल्स टाकून स्लो गॅस वर गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्या
- 4
कचोरी चाट बनवण्यासाठी मोठ्या साईज ची कचोरी बनवण्यासाठी तयार केलेले बॉल्स पोळपाटावर हलक्या हाताने लाटून घ्या. मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कचोरी फ्राय करून घ्या
- 5
कचोरी चाट बनवण्यासाठी मोठ्या कचोरी चे तुकडे 5-6करून वरून दही टाका.
- 6
चिंचेची चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला,लाल तिखट, बारीक शेव बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गार्निश करा.
- 7
कचोरी चाट प्लस मिनी कचोरी गोठा तयार आहे रेडी टू इट
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या (5)