नारळाची चटणी (कैरीची) (naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7
महाराष्ट्रीयन जेवणामध्ये डावी बाजू महत्त्वाची असते. या डाव्या बाजूला मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर असे पदार्थ वाढले जातात, हे पदार्थ आपल्या जेवणाची चव वाढवतात. खरं सांगायचं तर मला या डाव्या बाजूच्या पदार्थांची फार आवड आहे. त्यातलीच एक नारळाची चटणी ,नारळाची चटणी जर कैरी घालून केली तर त्याची चव अप्रतिम लागते. ही चटणी जेवणात तर चव वाढवतेच पण भजी, बटाटेवडे, पराठे , कटलेटबरोबरही खायला खूप छान लागते. माझी आई खूप छान चटणी बनवायची खास करून कैरी ची...

कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर साफ करून, धुऊन घ्या. मिक्सर चे भांडे घेऊन त्यामध्ये किसलेला ओला नारळ, कोथिंबीर मिरची,आलं,लसूण,जीरे घालून घ्या.
- 2
एक छोटी कैरी घेऊन तिचे साल काढून बारीक तुकडे करून ते या वरील मिश्रणात घाला. चवीनुसार मीठ, साखर घालून दोन चमचे पाणी घालून चटणी वाटून घ्या. मिक्सर चे भांडे उघडून चमच्याने सर्व मिश्रण नीट एकजीव करून गरज असेल तर थोडेसे पाणी घालून परत हे मिश्रण बारीक वाटून घ्या.
- 3
आपली कैरीची चटणी तयार आहे. यात लसूण वापरणे ऑप्शनल आहे पण लसूण त्याला एक छान चव देतो.सणासुदीच्या दिवसांमध्ये ही चटणी लसूण न घालता केली जाते.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)