पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता (peri peri white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10
पास्ता म्हटला म्हणजे आत्ताच्या पिढीला जीव की प्राण!! आमच्या घरीही माझ्या मुलाला पास्ता अतिशय प्रिय आहे आणि खास करून त्याला व्हाईट सॉस मधला पास्ता खूप आवडतो.. हा व्हाईट सॉस पास्ता करताना त्यामध्ये थोडीशी कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो आज येथे मी पेरी पेरी मसाला वापरून हा पास्ता केला आहे. पास्ता करताना बरेच वेळेला एक प्रॉब्लेम असतो तो पास्ता ड्राय होतो ,आपली ग्रेवी थोड्यावेळानी सुकते. पास्ता करताना आपण जर नुसते पाणी वापरले तर त्याला काही चव येत नाही अशा वेळेला आपण ज्या पाण्यामध्ये पास्ता शिजवतो ते पाणी सॉस करताना त्यात घालावे म्हणजे सॉसला दाटपणा येतो आणि चवही चांगली लागते.

कुकिंग सूचना
- 1
तुम्हाला आवडेल तो पास्ता मीठ घातलेल्या पाण्यामध्ये साधारण पाच ते सात मिनिटे उकळवून घ्या. नंतर पास्ता लगेच चाळणीत काढून त्यावर गार पाणी होता म्हणजे तो जास्त शिजणार नाही आणि मग त्याच्यावर थोडे ऑलिव्ह ऑईल घाला म्हणजे पास्ता सुटा राहील.
- 2
एका नॉनस्टीक पॅनमध्ये बटर आणि ऑलिव्ह ऑइल घालून त्यावर मैदा व्यवस्थित भाजून घ्या मग त्यामध्ये एक कप दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर या सॉसमध्ये दोन चीज स्लाईस, गार्लिक मेयॉनीज, थोडेसे मीठ, गरजेनुसार पास्ता उकळलेले पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- 3
या सॉसला उकळी आली की त्यामध्ये पेरी पेरी मसाला, ओरेगानो आणि चिली फ्लेक्स टाकून सर्वात शेवटी पास्ता घालून मंद आचेवर एक-दोन मिनिटे मिक्स करून घ्या. गरमागरम सर्व्ह करताना त्यावर आवडत असेल तर परत ओरेगॅनो,चिली फ्लेक्स घाला.
Top Search in
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या