दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नॉन स्टिक पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून खवा भाजून घेतला त्याचवेळी एका बाजूला काजू ही तुपात परतून घेतले.
दुधी भोपळ्याची साल काढून घेऊन खिसून घेतले. - 2
तुपात परतून घेतलेले काजू व खवा एका ताटात काढून घेतले.
परत दोन चमचे तूप टाकून दुधी भोपळ्याचा किस अजिबात पिळून न घेता परतून घेतला.
आता दुधी भोपळ्याच्या रसातच पाच मिनिटे शिजवुन घेतले.
आता त्यात साखर टाकून साखरेला सुटलेले पाणी आटवून घेतले. - 3
आता त्यात खवा,वेलची पावडर आणि टुटी फ्रुटी टाकून चांगले एकजीव करुन घेतले.वरती परत एक चमचा तूप टाकले.
- 4
अशा प्रकारे स्वादिष्ट आणि लज्जतदार दुधी भोपळ्याचा हलवा तयार झाला 🧡🤍💚
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15916239















टिप्पण्या