कुकिंग सूचना
- 1
एका वाटीमध्ये ड्राय yeast घ्यावे व त्यात साखर व पाणी घालून मिक्स करावे
- 2
भिजवलेल्या तांदळामध्ये पाणी सर्व निथळून घ्यावे व एका मिक्सरच्या भांड्यात तांदूळ, खवलेला ओला नारळ, गरजेनुसार नारळाचे दूध व पाणी घालून हळूहळू बारीक पेस्ट होईपर्यंत वाटावे
- 3
तांदळाच्या तयार पेस्ट मध्ये साखर व यीस्ट मिक्स केलेले पाणी घालावे व रात्रभर आंबण्यासाठी ठेवावे
- 4
दुसऱ्या दिवशी पीठ फुलून आल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे व चांगले मिक्स करावे गरज असल्यास थोडा पातळ करावे हे पीठ डोशापेक्षाही थोडं पातळ लागते
- 5
अप्पम बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारची कढई लागते त्याला अप्पम चेट्टी असे म्हणतात
- 6
अप्पम चेट्टी मध्ये तयार केलेले पीठ एक पळीभर ओतावे व कढईचे दोन्ही कान धरून संपूर्ण गोल फिरवून आप्पांचे पीठ सर्वत्र पसरावे
- 7
शक्यतो नॉनस्टिक कढई असल्यामुळे तेल लावायची गरज भासत नाही पण गरज वाटल्यास थोडेसे तेल चमच्याच्या मदतीने साईडने पसरावे. झाकण देऊन अप्पम कढईतून सुटेपर्यंत किंवा एका बाजूने सोनेरी रंगाचा होईपर्यंत शिजवून घ्यावे
- 8
हे अप्पम साईडने पातळ कुरकुरीत व मध्ये थोडे जाड असतात. गरम गरम चटणी बरोबर खायला द्यावे.
Similar Recipes
More Recipes
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
- झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
- बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)










टिप्पण्या