हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी (Hirvya Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
#NVR.. विदर्भात ग्रामीण भागात होणारी, उपलब्ध साहित्यात बनणारी, हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी..
हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी (Hirvya Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)
#NVR.. विदर्भात ग्रामीण भागात होणारी, उपलब्ध साहित्यात बनणारी, हिरव्या बरबटीच्या दाण्यांची चटणी..
कुकिंग सूचना
- 1
दाणे स्वच्छ धुवून घ्यावेत. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात.
- 2
मिक्सर पॉट मध्ये दाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जीरे घालावे.
- 3
चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी. मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे. आता त्यातच लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे.
- 4
आता ही तयार झालेली चटणी एका बाउल मध्ये काढून घ्यावी. तडका देण्यासाठी पॅनमधे तेल टाकून ते गरम करावे. जीरे मोहरी आणि हळद टाकावी.
- 5
हा गरम तडका, चटणी मध्ये टाकावा. आणि चांगले मिक्स करून घ्यावे.
- 6
मस्त चविष्ट, आणि स्वादिष्ट चटणी, जेवताना वाढण्यासाठी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16645845

टिप्पण्या (2)