वडापाव (Vadapav Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#NVR
सगळीकडे आवडणारा पदार्थ म्हणजे वडापाव.

वडापाव (Vadapav Recipe In Marathi)

#NVR
सगळीकडे आवडणारा पदार्थ म्हणजे वडापाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
8 सर्व्हिंग्ज
  1. 6उकडलेले बटाटे
  2. 6ते सात हिरव्या मिरच्या, दहा लसणाच्या पाकळ्या,दीड इंच आलं व अर्ध वाटी कोथिंबीर सगळ सरभरीत वाटलेलं
  3. 1/2लिंबाचा रस
  4. 10कढीपत्त्याची पाने
  5. 1 चमचातेल फोडणीसाठी
  6. 1/2 चमचामोहरी,चिमूटभर हिंग,1/4 चमचा हळद
  7. चवीनुसारमीठ, चिमूटभर साखर
  8. 2 वाटीचणा डाळीचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  9. चिमूटभरहळद चिमूटभर तिखट व अर्धा चमचा मीठ
  10. वडे तळण्यासाठी तेल
  11. चिमूटभरसोडा

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम बटाट्याची सालं काढून ती कूचकरून घ्यावी त्यामध्ये मीठ,साखर,लिंबाचा रस घालावां,सरबरीत वाटलेलं वाटण घालावं सगळं एकजीव करावं

  2. 2

    फोडणीची पळी गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं तेल गरम झालं की हिंग मोहरी व हळद घालून कढीपत्ता घालावा व तो यावरील कुचकरलेल्या भाजीवर घालावा व त्याचे छोटे गोळे तयार करून ठेवावेत

  3. 3

    बेसन पीठ तांदळाचे पीठ सोडा मीठ हळद तिखट सगळं एकजीव करावं त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून छान फेटून घ्यावं व पीठ तयार करून ठेवावे कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की

  4. 4

    एकेक बटाट्याच्या भाजीचा गोळा घेऊन तो बेसनाच्या पिठात घोळवावा व गरम तेलात सोडून सोनेरी रंगावर वडे तळून घ्यावे अशाच रीतीने सर्व वडे तळून घ्यावे अतिशय खुसखुशीत खमंग टेस्टी असे वडे तयार होतात. खोबऱ्याची लाल चटणी व तळलेल्या मिरची बरोबर आपण हे वडे पावाबरोबर खाऊ शकतो अतिशय टेस्टी व सुंदर असे वडे तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes